नखांना नखं घासल्याने खरंच केस वाढतात का ? जाणून घ्या खरं उत्तर

योगगुरू बाबा रामदेव यांनी काही वर्षांपूर्वी केस वाढवण्याचा अनोखा मार्ग सांगितला होता. दोन्ही हातांची नखे घासल्याने डोक्यावरील केस लवकर वाढतात, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या दाव्यामागे खरोखरच काही वैज्ञानिक तथ्य आहे का की त्यांनी हे हवेतच सांगितले. या उपायांचा परिणाम वाचून तुम्ही थक्क व्हाल.चला तर मग जाणून घेऊयात या उपायाचे सत्य. हा उपाय केल्याने खरंच तुमचे केस वाढतील का हे जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य : टाईस ऑफ इंडिया)

​या आसनामुळे रक्तपुरवठा जलद होतो

योगामध्ये अनेक प्रकारची आसने आहेत. यापैकी एका आसनाचे नाव आहे बालयम आसन. हे आसन केल्याने रिफ्लेक्सोलॉजीच्या तत्त्वावर कार्य करते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तुमची नखे रक्तवाहिन्यांद्वारे डोक्याच्या मज्जासंस्थेशी जोडलेली असतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही दोन्ही हातांची नखे एकत्र घासता तेव्हा त्यामुळे रक्तपुरवठा तीव्र होतो, ज्यामुळे डोक्याला रक्तपुरवठाही वाढतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय करु शकता.

हेही वाचा :  ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ठेवता? केसांवर होईल हा महाभयंकर परिणाम

केस मजबूत होतात

केसांची वाढ कॉर्टिकल पेशींमुळे होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पेशी केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेल्या असतात. जेव्हा नखे एकत्र घासतात, ते केराटिनच्या वाढीस प्रोत्साहन देते. ज्यामुळे कॉर्टिकल पेशी तयार होतात आणि डोक्याचे केस मजबूत होतात.

​असे करा आसन

हे आसन करायला अतिशय सोपे आहे. हे करताना तुम्हाला फक्त दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासायची आहेत. यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होईल.

​या व्यक्तीने अजिबात करु नये हे आसन

हे आसन सर्वांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी हे आसन करणे टाळावे, असे योगगुरू सांगतात. याचे कारण म्हणजे बालयम आसन केल्याने शरीरातील रक्तदाब वाढतो, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. ज्यांची अँजिओग्राफी किंवा शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनीही हे आसन करू नये. यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …