इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच… पाहा नावाचा अर्थ

इशा अंबानी आणि आनंद पिरामल हे आई-बाबा झाले आहेत. अंबानी आणि पिरामल कुटुंबात अतिशय आनंदाचा क्षण आला आहे. इशाने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. इशाने एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. इशा अंबानी यांनी आपल्या मुलांची नावे देखील जाहिर केले आहेत.

इशा आणि आनंद यांचा २०१८ डिसेंबरमध्ये विवाह झाला होता. या शाही सोहळ्याची जगभरात चर्चा झाली होती. इशा आणिआनंद यांच्यासाठी हा खास क्षण आहे. या दोघांनी आपल्या मुलांची नाव जाहिर केल्यानंतर या नावांची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. इशाने बाळांना दिलेली नावे अतिशय गोड आहेत. या बाळांची नावे आणि त्यांचा अर्थ जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​इशा आणि आनंद यांच्या जुळ्या मुलांची नावे

इशा आणि आनंद यांना शनिवारी १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जुळी मुलं झाली आहेत. अंबानी आणि परिमल कुटुंबाने रविवारी ही गुड न्यूज जगासमोर शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे या जुळ्या बाळांची नावे देखील जाहिर करण्यात आली आहे. इशाने एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिला आहे. इशाच्या मुलीचे नाव आदिया (Aadiya)आणि मुलाचे नाव कृष्णा (Krishna) असं आहे.

हेही वाचा :  Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत

(वाचा – कधीही आई न होऊ शकणाऱ्या Nita Ambani यांनी कसं अनुभवलं मातृत्व)

​इशाच्या मुलीच्या नावाचा अर्थ

इशा अंबानी आणि आनंद परिमल यांच्या मुलांचे नावे जाहिर झाले आहेत. इशाने आपल्या मुलीचे नाव आदिया असं ठेवलं आहे. आदिया (Aadiya) या नावाचा अर्थ आहे सुरूवात आणि पहिली शक्ती असा आहे. आदिया या नावाचा अंकशास्त्रानुसार ५ हा शुभांक आहे. आदिया या नावाच्या अर्थानुसार तिच्यात दूरदर्शी, साहसी, खर्चिक, स्वातंत्र्य-प्रेमळ, अस्वस्थ, आध्यात्मिक, साहसी, उत्साही, जिज्ञासू, दूरदर्शी, चुंबकीय, विस्तृत आणि अध्यात्मिक असण्यासारखे गुणधर्म आहेत.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​इशाच्या मुलाच्या नावाचा अर्थ

इसाने मुलाला ‘कृष्णा’ (Krishna)असं नाव दिलं आहे. कृष्ण हे हिंदू देव, भगवान विष्णू यांचे नाव आहे. हे संस्कृत शब्द कृष्णापासून आले आहे. कृष्ण म्हणजे प्रेम, शांती आणि आपुलकी. कृष्णाच्या नावाच्या अंकशास्त्रानुसार ८ हा शुभांक आहे. कृष्णा नावाची व्यक्ती व्यावहारिक, स्थिती-प्रेमळ, शक्ती शोधणारी, भौतिकवादी, निष्पक्ष, स्वावलंबी आहे.

(वाचा – रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या १० Golden Advice)

हेही वाचा :  मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क

​गृतव

तुम्ही तुमच्या बाळासाठी एखादे वेगळे नाव शोधत असाल. तर तुम्ही गृतव या नावाचा विचार करू शकता. गृतव (Grutav) नावाचा अर्थ कृतज्ञ आहे. ज्याने प्रत्येकाला चांगल्या विचारांनी आणि काळजीने सन्मानित केले आहे. हे नावच नाही तर त्याचा अर्थही खूप सुंदर आहे.

(वाचा – वडिलांच्या कामाची मुलीला वाटायची लाज, पण मोठी झाल्यावर जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही)

​जैतिक

हे नाव तुम्ही तुमच्या मुलालाही देऊ शकता. जैतिक नावाचा अर्थ विचारशील स्वभावाचा, जिंकणारा आणि जिंकणारा असा आहे.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

नोहा

नोरा नावाप्रमाणेच नोहा हे नाव देखील आहे. नोहा नावाचा अर्थ “विचारशील किंवा दयाळू किंवा स्वीकारणारा” असा आहे. जर तुमच्या मुलीचे नाव ‘न’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव नोहा ठेवू शकता.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​वृतिका

या बाळाचे नाव अतिशय अनोखे आणि गोंडस आहे. जर तुम्हाला असे नाव ठेवायचे असेल. जे फार कमी ऐकले गेले असेल असे नाव ठेवा. तर तुम्ही वृतिका हे नाव निवडू शकता. वृतिका नावाचा अर्थ जीवनातील यश किंवा विचार.

हेही वाचा :  वय वर्षे ५२ पण फिटनेस पंचविशीतला! ऐश्वर्या नारकरच्या हेल्दी आयुष्याचं रहस्य

(वाचा – आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …