Smartphone वापरताना निष्काळजीपणा केल्यास होऊ शकतो Blast, पाहा सुरक्षा टिप्स

नवी दिल्ली: How To Avoid Smartphone Blast : कधी बॅटरीमुळे तर कधी अतिउष्णतेमुळे फोनचा स्फोट झाल्याचे गेल्या काळात समोर आले आहे. स्फोटामुळे युजर्स जखमी सुद्धा होतात. तर, काहींना यामुळे जीव देखील गमवावा लागला आहे. अनेकदा लोक यासाठी स्मार्टफोनला आणि तांत्रिक अडचणींना दोष देतात. मात्र, स्मार्टफोनमधील बिघाडामुळे प्रत्येक वेळी असे होत नाही. कधी- कधी युजर्सच्या चुकींमुळेही अशा घटना घडतात. असे होऊ नये याकरिता आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट होण्याची शक्यता कमी करू शकता.

वाचा: Phone Charging: स्मार्टफोन चार्ज करताना हे ५ पॉईंट्स ठेवा लक्षात, अँड्रॉइड फोन होईल पटापट चार्ज

उष्णतेपासून संरक्षण करणे आवश्यक :

जर तुम्ही घराबाहेर बसले असाल आणि तुमचा स्मार्टफोन टेबलवर असेल किंवा तासन्तास तसाच ठेवला तर, उन्हामुळे स्मार्टफोन खूप गरम होऊ लागतो. या उष्णतेमुळे स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये दाब वाढू लागतो. काही काळानंतर तुम्ही स्मार्टफोन वापरत असताना, त्या काळात प्रोसेसरच्या उष्णतेमुळे ते आणखी गरम होते, ज्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. अशी वेळ तुमच्या स्मार्टफोनवर येऊ नये असे वाटत असेल तर तो थेट उघड्यावर ठेवू नये.

हेही वाचा :  वृद्ध शेतकऱ्याची धगधगत्या चितेत उडी; सरणाशेजारील दिवा पाहून पोलिसही हादरले

वाचा: Samsung Galaxy, iPhone आणि Google च्या या स्मार्टफोन्सवर तब्ब्ल ४० टक्क्यांपर्यंत ऑफ, फीचर्स A1

तासन्तास खिशात ठेवू नका:

स्मार्टफोन तासनतास खिशात ठेवला तर, त्यामुळेही तो खूप गरम होतो. जर तुम्ही इतर काही सामान खिशात ठेवले असेल तर ते लवकर गरम होऊ लागते. इतकेच नाही तर, अनेक वेळा लोक बॅगेत सामानासोबत स्मार्टफोनही ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चेतावणी आहे. कारण, असे केल्याने बॅटरी उत्तेजित होते, ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो.

हे करणे टाळा:

जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर, Phone Blast होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र, अनेक वेळा असे घडते की, लोक स्मार्टफोनचा वाईट पद्धतीने वापर करतात आणि त्यामुळे त्यात समस्या येऊ लागतात. म्हणून तुमचा स्मार्टफोन सुस्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स वापरा.

वाचा: बेस्टच ! २०० MP कॅमेरासह येणारा Motorola Edge 30 Ultra झाला २२ हजारांनी स्वस्त

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …