दुस-या मुलीचं नाव ऐकलं तरी बायकोचा होतो जळफळाट? झोपेतही पाठ ठेवा तिला खुश करणारी ही 1 ट्रिक

जेव्हा एखादी मुलगी प्रेमात असते तेव्हा ती त्या मुलाला मिळवण्यासाठी आणि त्याला आपलेच ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. नवरा असो वा प्रियकर, तिला आपल्या आयुष्यातील जोडीदार कोणाशीही शेअर करायला आवडत नाही. कधी कधी प्रेम हे तिच्यासाठी वेड बनते. अशावेळी तिचा आपल्या बॉयफ्रेंडवरही विश्वास राहत नाही. त्याने केवळ आपल्याशीच बोलावं अशी तिची इच्छा असते. अशा स्थितीत त्या जोडीदाराने अन्य कोणत्याही स्त्रीचा साधा उल्लेख जरी केला तर वादाची ठिणगी पडलीच म्हणून समजा!

वास्तविक, हे अशा लोकांसोबत अधिक घडते ज्यांच्यामध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यांना नेहमीच भीती असते की त्यांच्या आवडत्या व्यक्तीला कोणी त्यांच्यापासून हिरावून घेईल. अशा स्त्रिया अन्य सर्व स्त्रियांना आपल्या नात्यातील शत्रू मानतात. जर तुम्ही अशा असुरक्षित गर्लफ्रेंड किंवा बायकोसोबत रिलेशनशिपमध्ये असाल, जी तुम्हाला तुमच्या अन्य मैत्रिणींशी बोलण्यास मनाई करते, तर आज आम्ही तुम्हाला उपयोगी पडतील अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे ती तुमच्यावर संशयच घेणार नाही. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

तिला समजावण्याची चूक करू नका

तिला समजावण्याची चूक करू नका

तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत बोलता म्हणून तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर रागावली असेल किंवा दुसर्‍या मुलीशी बोलता म्हणून तुम्हाला टोमणे मारत असेल तर अश्वेली तिचा राग अतिशय काळजीपूर्वक हाताळा. तुला गैरसमज झाला आहे असं म्हणण्याची चूक अजिबात करू नका. अशाने वाद अजून वाढू शकतो. तिचा राग अधिक मोठा होऊ शकतो. तिला शांत होऊ द्या, मगच तिच्याशी बोला.

(वाचा :- ​5 वर्षापूर्वी या जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी केलं असं काही की झाली होती बेदम मारहाण,यामागील भयंकर कारण आलं समोर)​

तिच्या काळजीची थट्टा उडवू नका

तिच्या काळजीची थट्टा उडवू नका

जर तुमची मैत्रीण इतर महिलांच्या नावाने चिडत असेल वा तिला तुम्ही तिच्यापासून दूर जाल म्हणून काळजी करत असेल तर तिची ही काळजी हसण्यावारी कधीच नेऊ नका. या गोष्टीवरून तिची थट्टा उडवू नका. तुझी काळजी फालतू आहे हे वाक्य तर चुकूनही बोलू नका. कारण तिची काळजी ही तुमच्यासाठी असते आणि तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेल्याने तिचा राग अधिक वाढू शकतो.
(वाचा :- लग्नानंतरही विसरता येत नाहीयेत जुन्या प्रेमातील रोमॅंटिक आठवणी? असे व्हा ब्रेकअपच्या दु:खातून कायमचे मुव्ह ऑन)​

हेही वाचा :  बायकोच्या या गोष्टीमुळे मी कर्जबाजारी झालोय, असंच चालत राहिलं तर मी लवकरच रस्त्यावर येईन

सोबत जास्त क्वालिटी टाईम घालवा

सोबत जास्त क्वालिटी टाईम घालवा

तुमच्या गर्लफ्रेंडचा हा राग कमी करण्यासाठी तिच्या सोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा. जेणेकरून तिला जाणीव होईल की तुम्ही अन्य मैत्रिणीपेक्षा तिला अधिक महत्त्व देता, वेळ देता. जर तुम्ही तिच्या सोबत कमी वेळ घालवाल तर त्यामुळे तिचा संशय अधिक बळावेल. म्हणून तिला हवा असलेला वेळ द्या म्हणजे ती तुमच्यावर कमी संशय घेईल आणि कमी रागावेल.
(वाचा :- प्रेमाचा जुगार खेळण्याआधी जाणून घ्या तुमचा पार्टनर स्वार्थी तर नाही ना? हे 5 संकेत आहेत Selfish लोकांची निशाणी)​

मैत्रिणींशी भेट करून द्या

मैत्रिणींशी भेट करून द्या

तुमच्या गर्लफ्रेंडचा हा स्वभाव बदलण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे तिची तुमच्या सर्व मैत्रिणीशी भेट करून द्या, जेणेकरून तिला तिचा गैरसमज चुकीचा आहे हे स्वत:च समजेल आणि तुमची मैत्री देखील तुटणार नाही. तुम्ही जितक्या गोष्टी तिच्यापासून लपवाल तेवढा तिचा संशय वाढत जाईल आणि त्रास तुम्हालाच होईल.
(वाचा :- 40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी-जावेद अख्तरमध्ये आजवर कधीच झाली नाहीत भांडणं, या एका मॅजिक ट्रिकचीच सर्व कमाल)​

फोन लपवू नका

फोन लपवू नका

आपल्या गर्लफ्रेंड पासून आपला फोन लपवण्याची चूक अजिबात करू नका. कारण यामुळे तुम्ही चुकीचे ठरता. जर तुम्ही काहीच चुकीचं करत नसाल तर घाबरण्याची अजिबातच गरज नाही. तिला कळू दे तुम्ही मैत्रिणींशी काय आणि कोणत्या विषयावर बोलता. यामुळे तिला तुमच्या बाबत विश्वास वाटू शकतो.
(वाचा :- गडगंज श्रीमंत घराण्याची सून तर झाली, पण नवऱ्याने जे केलं ते ऐकून हादराल, यासाठी जबाबदार ठरले सासरचे कुटुंबच)​

हेही वाचा :  काश..! लग्नाआधी मला ‘या’ 5 गोष्टी माहित असत्या तर बरं झालं असतं

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …