Monday Office Mood Says Cat Viral Video | सोमवारी ऑफिसला जाण्याचा कंटाळा येतो का? मांजर सांगते कसा असतो मूड, पाहा Viral Video


सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात.

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ तर जीव की प्राण, असे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. अल्पावधीतच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. आता एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. मांजर सोमवारी ऑफिसला जाताना कसा मूड असतो हे सांगते. या मांजरीची अवस्था पाहून तुम्हाला सोमवारी ऑफिसला जाताना कसं वाटतं? याची जाणीव होईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मांजर पायऱ्यांवरून खाली येत आहे. पण पायऱ्या उतरण्याची शैलीच अशी आहे की, लोकांना त्याच्याबद्दल वाईट वाटतंय आणि हसूही येतंय. व्हिडीओमध्ये दिसणारी ही मांजर पायऱ्यांवरून खाली रेंगाळत येत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने ‘बोरिंग डे’ लिहून शेअर केला आहे. लोकांना ही पोस्ट आवडली असून त्यांनीही खूप कंटाळवाणा दिवस असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा :  दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

वीकेंड आनंदात घालवल्यानंतर सोमवारी पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. इच्छा नसताना सोमवारी सकाळी अंथरुणातून उठून तयारी कशी करावी लागते? अशा कमेंट्स अनेकांनी दिल्या आहेत. एका यूजरने तर कमेंट करत विचारले की, या मांजरीला दुधात मिसळून काय दिले?. तर दुसऱ्या युजर्सने असं लिहिलं आहे, माझी अवस्थाही अशीच असते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …