महिला आयपीएल आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील अंतर भरून काढेल- हरमनप्रीत कौर

Women’s IPL 2023: दिर्घकाळापासून बहुप्रतिक्षीत असलेल्या महिला आयपीएलचं आयोजन पुढच्या वर्षी मार्च महिन्यात केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसह भारताच्या अनेक महिला क्रिकेटपटूंनी आयपीएलबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षी खेळली जाणारी महिला आयपीएल स्पर्धा आंतरराष्ट्रीय आणि  देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंतर भरून काढण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीत कौरनं दिलीय. 

पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत या लीगमधील एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. या पाच परदेशी खेळाडूंपैकी चार खेळाडू आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील असतील. तर, 5 वा खेळाडू असोसिएट्स देशाचा असू शकतो. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू सहभागी होतील. ज्यात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडू असतील.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
स्टार स्पोर्ट्स शो फॉलो द ब्लूज मध्ये बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, “तिनं भारतीय संघाच्या कर्णधारापर्यंतच्या प्रवासाचा किस्सा सांगितला. माझ्यासाठी सर्व खेळाडूंना एकत्रित ठेवणं खूप महत्वाचं आहे. एक कर्णधार म्हणून आणि एक लीडर म्हणून माझी जबाबदारी आहे की, त्यांच्याशी संवाद साधणं आणि एक क्रिकेटर म्हणून ते आपल्या चुका कशा पद्धतीनं सुधारू शकतात. या सर्व गोष्टी मला त्यांना मैदानावर नेतृत्व करण्यास मदत करतात.त्यांचा माझ्यावर आणि माझ्या प्लॅनिंगवर विश्वास आहे.तुमचा तुमच्या संघावर विश्वास असेल तर तुम्ही मैदानावर कुठंही मागं पडू शकत नाही. टीममध्ये आमच्याकडे असलेला विश्वासाचा घटक सध्या आमच्याकडे असलेली ताकद आहे. महिला आयपीएल भारतातील महिला क्रिकेटमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आयपीएल हे महिला क्रिकेटसाठी एक मोठे पाऊल आहे.”

हेही वाचा :  अक्षर-सूर्याची अर्धशतकं व्यर्थ, दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंका 16 धावांनी विजयी

महिला आयपीएलमुळं महिला क्रिकेटमधील बर्‍याच गोष्टी बदलतील- जेमिमाह रॉड्रिग्स
भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स महिला आयपीएलमुळं भारतीय देशांतर्गत क्रिकेटवर नेमका काय परिणाम होईल? याबाबत तिनं स्पष्टीकरण दिलंय. “महिला आयपीएलमुळं भारतातील महिला क्रिकेटमधील बर्‍याच गोष्टी बदलणार आहेत. हे आमच्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे. कारण भारतीय संघ म्हणून आम्ही विश्वचषक आणि राष्ट्रकुल यांसारख्या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहोत. महिला आयपीएलमुळं खेळाडूंना आपल्या चुकांमध्ये सुधारणा करता येईल. तसेच महिला आयपीएल युवा खेळाडूंना त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरेल. मला खात्री आहे की भारतातील महिला क्रिकेट महिला आयपीएलनंतर पुढील स्तरावर जाण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळं आम्ही महिला आयपीएलसाठी उस्तुक आहोत. 

News Reels

महिला आयपीएलबाबत स्मृती मानधनाची प्रतिक्रिया
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनानं महिला आयपीएलची तुलना परदेशी लीग द हंड्रेड आणि डब्लूबीबीएल लीगशी केली. या लीगमुळं त्यांच्या देशातील खेळाडूंना आपल्या खेळात सातत्य आणण्यासाठी कशी मदत मिळाली? याबाबत स्मृती मानधनानं भाष्य केलंय. महिला आयपीएलमुळं आपल्या देशातील युवा महिला क्रिकेटपटूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ग्रास रूटनुसार आणि आम्ही पाहिले आहे की बिग बॅश आणि द हंड्रेड यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला त्यांच्या स्थानिक सेटअपमध्ये तसेच इतर गोष्टींमध्ये कशी मदत केली आहे. मला खरोखर आनंद आहे. भारतीय संघाला महिल आयपीएलचा खूप फायदा मिळेल.

हेही वाचा :  निवृत्तीची घोषणा करताना श्रीशांत झाला भावनिक; लाइव्हचा Video Viral

महिला आयपीएल लीगच्या संघाची नावं कशी असतील?
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डानं अद्याप महिला आयपीएल संघ शहरांच्या नावावर किंवा झोनच्या नावावर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. संघ क्षेत्रानुसार विकले गेल्यास ते उत्तर (जम्मू/धर्मशाला), दक्षिण (कोची/विशाखापट्टणम), मध्य (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व (रांची/कटक), उत्तर पूर्व (गुवाहाटी) आणि  पश्चिम (पुणे/राजकोट) असं असण्याची शक्यता आहे.  ज्या ठिकाणी पुरूष आयपीएलचे सामने खेळले जात नाहीत, अशा ठिकाणीच महिला आयपीएल लीगमधील सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं.

या पद्धतीन सामने खेळवले जातील
बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महिला आयपीएल लीगच्या गट सामन्यात संघ दोनदा एकमेकांसमोर येतील. या लीगमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असेलल्या संघाला संघाला एलिमिनेटर सामने खेळून अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …