वाशिम : जेवणाच्या ताटावरच मित्राने केली मित्राची हत्या; मानेवर थेट…

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली. या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेवत असतानाच मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच त्याच्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे.

मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध धनज पोलीस घेत आहेत. हत्या झालेला व्यक्ती आणि हत्या करणारा हे दोघे सोबत काम करणारे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. नेहमी सोबत असणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना रात्री 9 च्या सुमारास वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करत होता. त्याचवेळी मित्राने अचानक येऊन संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने जागेवरच संतोषचा मृत्यू झाला.

हेही वाचा :  Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विणाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

चंद्रपुरात डंपिंग यार्डमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

चंद्रपुरात डंपिंग यार्ड मध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुन्हेगारी वृत्तीच्या सुरजसिंह कुंवर (25) याची अष्टभुजा वॉर्ड परिसरात दहशत होती. एका दारू पार्टीत त्याचा साथीदारांशी वाद झाल्यावर पाच जणांनी मिळून सुरजसिंह याला धारदार शस्त्रांनी संपवले. शवाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क डंपिंग यार्डमध्ये टाकण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी घटनास्थळी रक्ताचे थारोळे पाहिल्यावर नागरीकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी खबरी जाळे विणत या प्रकरणाचा माग काढून मृतदेह हुडकून काढला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …