‘वेड’ ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ved Day 4th Box Office Collection: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी  रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि  जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं रणवीर सिंहच्या सर्कस या चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

वेड चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 3.25 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.50 कोटी कमावले. आता चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटानं 3.02 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई 13.02 कोटी एवढी झाली आहे. 


रणवीरच्या सर्कसला टाकलं मागे

हेही वाचा :  'भलरी...' गाणं प्रदर्शित; भाऊसाहेब शिंदेचा हटके अंदाज

सर्कस या चित्रपटानं सोमवारी केवळ 75 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर वेड चित्रपटानं सर्कसला मागे टाकत सोमवारी 3.02 कोटींची कमाई केली. वेड चित्रपटामधील एका गाण्यात सलमान खाननं काम केलं आहे. या चित्रपटातील बेसुरी, सुख कळले, वेड लागलंय या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : ‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’; रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …