वॉइस स्टेटस, चॅट लॉक आणि बरंच काही…; WhatsApp चे नवीन हटके Features पाहिलेत का?

WhatsApp Features 2023 : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सएप हे असतंच. काही छोटी गोष्ट कोणाला सांगयची असेल तर आपण लगेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करतो. अशातच आता  Whatsapp यूजर्सच्या सोयीसाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करण्यात आलेत. या वर्षी Whatsapp ने 5 नवीन फीचर्स लाँच केलेत. हे यूजर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत. चला पाहूया हे 5 नवीन वैशिष्ट्ये.

मल्टीपल अकाउंट फीचर  

युजर्स बऱ्याच काळापासून याची वाट पाहत आहेत. कारण हे वैशिष्ट्य आता तुम्हाला एकापेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये एक अखाऊंट वापरण्याची परवानगी देतं. तुम्हाला फक्त वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Link To Existing Account वर क्लिक करा

चॅट लॉक 

पूर्वी युझर्सना चॅट लपवण्यासाठी चॅट आर्काइव करावे लागायचे किंवा व्हॉट्सअॅपला लॉक करावे लागायचे, परंतु कंपनीने वापरकर्त्यांची ही समस्या दूर करत चॅट लॉक करण्याचे वैशिष्ट्य आणले आहे. चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे चॅट ओपन करावे लागेल आणि नंतर त्यांच्या नावावर क्लिक करावे लागेल, नावावर क्लिक केल्यानंतर येथे खाली स्क्रोल करा तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल.

हेही वाचा :  अ‍ॅपल युजर्सनी त्वरित करावे 'हे' काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, सरकारने दिला इशारा | Apple product should be updated immediately; Otherwise there could be huge losses, the government warned

एडिट मॅसेज

हे फीचर युजर्ससाठी खूप महत्वाचे आहे कारण आत्तापर्यंत मेसेज पाठवताना काही चूक झाल्यास तो मेसेज डिलीट करून पुन्हा टाईप करावा लागायचा पण आता मेसेज पाठवल्यानंतर जर काही चूक झाली तर तुम्ही तो डिलीट न करता एडिट करू शकता. मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत मेसेज एडिट करू शकतो.

स्टेटस लिंक प्रीव्यू 

जर एखाद्याने युझरच्या स्थितीवर कोणतीही लिंक पेस्ट केली तर, आता या वैशिष्ट्यानंतर, व्हाट्सएप URL आणते आणि नंतर URL मध्ये Thumbnail म्हणून त्याचा फोटो दिसून येतो.

वॉइस स्टेटस

व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकण्यासाठी युजर्सना आता टाइप करण्याची गरज नाही. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने यावर्षी व्हॉईस स्टेटस फीचर देखील आणले आहे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …