या छोटाशा फळात आढळणारं व्हिटॅमिन आहे युरिक अ‍ॅसिडचं दुश्मन, क्षणभरात हे 12 भयंकर आजार करतं छुमंतर

तुम्हाला माहित आहे का, आंबट-गोड स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अनेक लोकांना स्ट्रॉबेरीचे हे फायदे माहीतच नाहीत हे दुर्दैव! आपण फक्त एक उत्तम फळ म्हणून त्याकडे पाहतो. विशेषत: उन्हाळी हंगामात मिळणारी स्ट्रॉबेरी आजकाल तर वर्षभर सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे स्ट्रॉबेरी खरेदी करणे सुद्धा सोप्पे झाले आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न नक्कीच पडला असेल की स्ट्रॉबेरी खाण्याचे नक्की काय फायदे आहेत?

तर मंडळी स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारण, हे फायबर फूड आहे, ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सम खूप कमी असतो. याशिवाय, USDA नुसार, 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमधून 58.8 मिलीग्रॅम व्हिटॅमिन-सी (Vitamin C in Stawberry) उपलब्ध होते. जे शरीरासाठी महत्त्वाचे तर असतेच पण 12 आजारांना दूर ठेवण्यास देखील मदत करते. (फोटो सौजन्य :- iStock, pixels)

व्हिटॅमिन सी चे 12 जबरदस्त फायदे

-12-

हेल्थलाइनच्या मते, पुरेसे व्हिटॅमिन सी जर शरीराला मिळाले तर त्यामुळे आपल्या शरीराला तब्बल 12 जबरदस्त फायदे मिळतात. व्हिटॅमिन सी हे पुढील फायदे देते –

  1. रक्तातील साखर वाढू देत नाही
  2. किडनी निकामी होण्यास प्रतिबंध करते
  3. उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते
  4. कोलेस्टेरॉल वाढू देत नाही
  5. ट्रायग्लिसराइड नियंत्रित करते
  6. रक्तातील यूरिक ऍसिड कमी करते
  7. संधिरोग प्रतिबंधित करते
  8. लोहाची कमतरता टाळते
  9. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
  10. स्मरणशक्ती तीक्ष्ण करते
  11. शरीरात विष तयार होऊ देत नाही
  12. डोळे निरोगी राखण्यास मदत करते
हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितले ऐन तारुण्यात येणाऱ्या ॲक्ने-पिंपल्सच्या समस्येवरील​​ 3 कारणे​ आणि ​उपाय

(वाचा :- Vitamin D Food हाडाचा सुकलेला सांगाडा बनवते तुमची ही 1 चुक, आयुष्यभर जागेवर खिळण्याआधी खायला घ्या हे 10 पदार्थ)​

बद्धकोष्ठता होते दूर

बद्धकोष्ठता होते दूर

स्ट्रॉबेरीमध्ये सॉल्यूबल आणि इनसॉल्यूबल फायबरचे प्रमाण चांगले असते. म्हणूनच ज्या लोकांना दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ते सॅलड किंवा स्मूदी बनवून स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते किंवा त्याचा त्रास कमी होतो. अनेक जाणकार देखील स्ट्रॉबेरी बद्धकोष्ठतेवर अतिशय उत्तम मानतात.

(वाचा :- ही 8 लक्षणं ओरडून सांगतात की हार्ट वॉल्व झालाय ब्लॉक, सतत धाप लागली व थकवा जाणवला तर ताबडतोब करा हे काम नाहीतर)​

पोटॅशियम घेते हृदयाची काळजी

पोटॅशियम घेते हृदयाची काळजी

USDA च्या मते, स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण सर्वाधिक असते. पोटॅशियमचे हे पोषक तत्व हृदयासाठी खूप महत्वाचे आहे, जे रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयविकार टाळते. म्हणूनच तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन केले पाहिजे. अनेक जण स्ट्रॉबेरी पाहून नाकं मुरडतात. त्यांनी तर हा फायदा एकून स्ट्रॉबेरीचे सेवन सुरु केलेच पाहिजे. जर तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर स्ट्रॉबेरी न खाण्याची चूक करू नका. उलट स्ट्रॉबेरी खा आणि हेल्दी राहा.

हेही वाचा :  CM Letter:मुख्यमंत्र्यांच्या नावे 51 हजार पत्र लिहिली; काढली मोठी मिरवणूक, नक्की काय आहे प्रकरण?

(वाचा :- Diabetes Tips : या स्टेजमध्ये कायमचा संपतो डायबिटीज, फक्त हे 2 उपाय करणा-यांना स्पर्शही करत नाही Blood Sugar..)​

मेंदू होईल खूप तीक्ष्ण

मेंदू होईल खूप तीक्ष्ण

रेड स्ट्रॉबेरी मेंदूसाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. रेड स्ट्रॉबेरी रोज खाणाऱ्या महिलांची विचारशक्ती आणि शिकण्याची शक्ती अन्य महिलांच्या तुलनेमध्ये जास्त असल्याचे दिसून आले होते. म्हणूनच स्ट्रॉबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून तुमच्या मेंदूला त्याचा फायदा होईल आणि तुमचा मेंदू अधिक वेगाने कार्य करू लागेल.
(वाचा :- Marburg Virus : मारबर्ग व्हायरसने 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर WHO हादरलं, चालता चालता सुरू होतात ‘ही’ 2 लक्षणं)​

ही गोष्ट लक्षात ठेवा

ही गोष्ट लक्षात ठेवा

आपण आतापर्यंत स्ट्रॉबेरीचे फायदे पाहिले पण तुम्हाला तर माहित आहेच की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट, याला स्ट्रॉबेरी देखील अपवाद नाही. स्ट्रॉबेरीची जशी चांगली बाजू आहे तशी वाईट बाजू आहे. तुम्ही स्ट्रॉबेरी खा पण मर्यदित प्रमाणातच खा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ही गोष्ट स्ट्रॉबेरीला देखील लागू होते. या शिवाय स्ट्रॉबेरी लहान मुलांना जास्त खायला देऊ नये कारण काही मुलांना यामुळे एलर्जी होऊ शकते.

हेही वाचा :  अरुंधतीचा ऑरेंज पैठणीचा लग्नाचा लुक, चाहत्यांच्या नजरा हलल्याच नाहीत

(वाचा :- या आजाराने गळतात केसांचे पुंजकेच्या-पुंजके, 1 दिवसात पडतं टक्कल,शास्त्रज्ञांचे हे 8 उपाय देतात लांब-घनदाट केस)​

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …