VIRAL VIDEO : म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह थेट झाडावर चढला, जंगलाचा राजा घाबरला का? | viral video lion climbs tree to save his life from buffalo herd prp 93


जंगलाचा राजा सिंह येताना दिसला की घाबरुन सगळेच प्राणी धूम ठोकतात. सगळेच जण ज्या सिंहाला घाबरतात तोच सिंह कधी इतर प्राण्याला घाबरलेला तुम्ही कधी पाहिलाय का? होय. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

मांजर ही सिंहाची मावशी असते असं म्हटलं जातं. तिने सिंहाला सगळं काही शिकवलं पण त्याला फक्त झाडावर चढायला शिकवलं नव्हतं. तुम्ही इंटरनेटवर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. जंगलाचा राजा सिंह येताना दिसला की घाबरुन सगळेच प्राणी धूम ठोकतात. सगळेच जण ज्या सिंहाला घाबरतात तोच सिंह कधी इतर प्राण्याला घाबरलेला तुम्ही कधी पाहिलाय का? होय. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

घाबरलेल्या सिंहाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात एक सिंह झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, त्यानंतर म्हशींचा संपूर्ण कळप दिसून येतो. सिंह त्यांच्यापासून काही अंतरावर आहे. पण म्हशींच्या कळपाला पाहून तो सिंह झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सिंह भीतीपोटी झाडावर चढत आहे की, असा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे, याची माहिती मिळत नाही.

हेही वाचा :  ‘Badhaai Do’ गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

आणखी वाचा : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

सिंह झाडावर चढत असल्याचा व्हिडीओ पाहताच लोकही आश्चर्यचकित झाले. कारण त्याच्या मागे उभ्या असलेल्या म्हशींच्या कळपाची अवस्थाही हैराण आणि त्रस्त दिसत होती. त्यांची शिकार करणारा हा सिंह काय करतोय हेही त्यांना समजले नाही. हा व्हिडीओ पाहताच लोकांनी कमेंटही केल्या. एका युजरने लिहिले की, कधी कधी शिकारी सुद्धा दुसऱ्या कुणाचा तरी शिकार बनतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

आणखी वाचा : पांढऱ्या रंगाचा झेब्रा कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अर्रर्र खतरनाक! सापाला ओंजळीने पाजतोय पाणी ; VIRAL VIDEO पाहून नेटकरी हैराण

त्यामुळे कोणत्याही प्राण्याला कमजोर समजू नका. वाघ वाघ असेल पण ती इतर काही प्राणी कळपाने एकत्र आले की मग ते वाघापेक्षा कमी नाही, हेच या व्हिडीओत दिसून येतं. सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, एकदा का सिंहाने हल्ला केला की खुद्द यमराज देखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. परंतु हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल हा राजा देखील दुसऱ्या प्राण्यांना घाबरतो.

हेही वाचा :  ISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला 'असा' होईल फायदा

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पहिल्यांदा सिंहाला कुणाला तरी घाबरलेलं पाहिलं असल्याची भावना व्यक्त केली आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. wild_animal_shorts_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ८ लाख १९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …