या कडू पदार्थापासून तयार केलेला हर्बल चहा, नसांमधून कोलेस्ट्रॉल करेल गायब

Bitter Gourd Tea For High Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. डॉक्टरांच्या औषधांपासून ते अगदी घरगुती उपायांपर्यंत. पण कारले खाल्ल्याने तुमची ही समस्या कमी होऊ शकते यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता का? हो हे खरं आहे कारल्याचे अनेक गुण आहेत. ही भाजी कडू जरी असली तरीही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या भाजीचा कडवटपणा कमी करण्यासाठी अनेक मसाले वापरून ही भाजी केली जाते. मात्र कारल्याचा रसही तितकाच फायदेशीर ठरतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कारल्याच्या रसाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. कारल्याचा रस जरी कडू असला तरीही तुम्ही त्याचा हर्बल चहा तयार करून शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोग करू शकता. कसा ते या लेखातून आम्ही माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही कारले​

​कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही कारले​

कारल्याचा ज्युस प्याल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे शरीराचे आतून क्लिन्झिंग होते, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. खरं तर कारल्याचे ज्युस पिणे सर्वांसाठी सोपे नसते. पण तुम्हाला कारल्याच्या रसाचा फायदा घ्यायचा असेल तर दुसरी पद्धत म्हणजे हर्बल टी बनवून घेणे. हे प्रसिद्ध नाही मात्र याचे फायदे नक्कीच कमाल करतात.

हेही वाचा :  ५ गोष्टींचा कराल वापर तर त्वरीत कोसळेल कोलेस्ट्रॉल, घरच्या घरी मिळेल उत्तम रिझल्ट

​कारल्याचा हर्बल टी बनवू शकता घरी​

​कारल्याचा हर्बल टी बनवू शकता घरी​

कारल्याचा चहा हे एक हर्बल ड्रिंक असून शरीरासाठी पौष्टिक ठरते आणि यामुळे नसांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. कारल्याचे सुकलेले स्लाईस तुम्ही पाण्यात घालून हा चहा तयार करू शकता. कारल्याची चहा पावडर अथवा अर्क स्वरूपात हे उपलब्ध होते. कारल्याच्या या चहाला गोह्या चहा म्हणूनदेखील ओळख आहे. Gohyah Tea तुम्ही घरातही तयार करू शकता. कारल्याच्या ज्युसपेक्षा चहा अधिक गुणकारी ठरतो.

(वाचा – ५ गोष्टींचा कराल वापर तर त्वरीत कोसळेल कोलेस्ट्रॉल, घरच्या घरी मिळेल उत्तम रिझल्ट)

​कसा तयार करावा कारल्याचा चहा?​

​कसा तयार करावा कारल्याचा चहा?​
  • कारल्याचा चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले सुकलेले अथवा ताजे कारल्याचे स्लाईस घ्या
  • आता यात १ कप पाणी घालून व्यवस्थित उकळून घ्या आणि मग ते पाणी गाळा
  • यामध्ये मधाचे २-३ थेंब टाकून हा चहा प्या

(वाचा – ‘Period Panty’ मासिक पाळीत वापरण्याचं प्रमाण का वाढलंय, कसा करावा वापर जाणून घेणे गरजेचे)

​सुक्या कारल्याच्या पानांचा चहा कसा बनवाल?​

​सुक्या कारल्याच्या पानांचा चहा कसा बनवाल?​

कारल्याचा चहा हा सुकवलेल्या पानांपासूनही बनवता येतो. पण कारले लवकर उपलब्ध होते त्यामुळे ताज्या कारल्याचा चहा बनविणे अधिक सोपे होते. कारल्याच्या पानांचा चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले पाणी उकळून घ्या आणि त्यात सुकी अथवा ताजी कारल्याची पाने घालून उकळा. त्यानंतर हे पाणी गाळा आणि त्यात मध मिक्स करून प्या.

हेही वाचा :  घाणेरडं कोलेस्ट्रॉल मुळापासून उपटून फेकून १०० च्या स्पीडने धावेल रक्त, फक्त दररोज खा १० पदार्थ

(वाचा – महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहेत चयापचयचे विकार! रोखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये)

​कोलेस्ट्रॉलची पातळी होईल कमी​

​कोलेस्ट्रॉलची पातळी होईल कमी​

कारल्याच्या चहात अँटी इन्फ्लेमेटरी घटक आढळतात. ज्याच्या मदतीने कोलेस्ट्रॉल पातळी कमी करता येते. कारल्याचा हा हर्बल टी तुम्ही दिवसातून २ वेळा पिऊ शकता. Bad Cholesterol Level कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग करून घेता येतो.

टीप – कारल्याचा ज्युस अथवा चहा पिण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आजारावर स्वतःहून कोणतेही उपचार करू नका. ही माहिती सामान्य ज्ञानासाठी असून याचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …