Breaking News
  • ताजमहालपेक्षा प्रेमाचं प्रतिक महाराष्ट्रात, टाटा मेमोरियल सेंटरच्या निर्मितीची रंजक कहाणी!
  • पुस्तक आणि व्यक्ती, विद्यार्थांचे वाढत अंतर…
  • घरी आणा मारुती सुझुकीची WagonR फक्त Rs.65k मध्ये, ऑफर मर्यादित वेळ, येथे खरेदी करा – Taza English Samachar
  • ITBP कॉन्स्टेबल भर्ती 2022: कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 287 पदांसाठी भरती, 10वी पास अर्ज – Taza Hindi Samachar
  • फक्त 50 रुपयांत तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता, पैसे थेट तुमच्या खात्यात येतील – Taza Hindi Samachar

Vijay Murali: दोन वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणारा मुरली विजय पुन्हा अपयशी

Tamil Nadu Premier League: भारतीय कसोटी संघातून वगळलेला मुरली विजय (Murli Vijay) तब्बल दोन वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर उरतला. तिरूनेलवेलीमध्ये सुरु असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) रुबी ट्रीची वॉरियर्सविरुद्ध मुरली विजयला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यानं 13 चेंडूत आठ धावा करून धावचीत झाला. 

मुरली विजयनं सप्टेंबर 2020 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. भारताकडून मुरली विजयनं 61 कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तामिळनाडूकडून खेळला नव्हता.  तो स्थानिक क्रिकेट टीएनसीए लीगमध्येही खेळला नव्हता. तो गेल्या वर्षी टीएनपीएलमध्ये खेळला होता. त्यानं डिसेंबर 2019 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून शेवटचा सामना खेळलाय. तर, भारताकडून 2018 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलंय. 

पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा मुरली विजयचा दावा
दरम्यान, मुरली विजयनं क्रिकेट खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा केला. “मला शक्य तितक्या दिवस खेळायचं आहे. मी वैयक्तिक ब्रेक घेतला. मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची होती. मी सध्या माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे”, असं मुरली विजयनं टीएनपीएलपूर्वी म्हटलं होतं. 

मुरली विजयची कारकिर्द
मुरली विजय हा भारतासाठी यशस्वी कसोटी सलामीवीरांपैकी एक आहे. भारताकडून त्यानं आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 39 च्या सरासरीनं 3 हजार 982 धावा केल्या. मुरली विजयच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 15 अर्धशतके आहेत. मात्र, मुरली विजयला त्याच्यात कारकिर्दीत एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्याची संधी फार कमी मिळाली आहे.

हे देखील वाचा-

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous IGNOU टर्म एंड परीक्षा देताय? आधी महत्वाची अपडेट जाणून घ्या
Next राजघराण्याच्या सूनेचा ‘शाही’ लूक

Check Also

टीम इंडिया टॉप पण पाकिस्तानचं काय होणार? असं आहे ग्रुप 2चं समीकरण

अ‍ॅडलेड, 02 नोव्हेंबर: विराट कोहली आणि लोकेश राहुलची अर्धशतकं त्यानंतर अर्शदीप, शमी आणि हार्दिक पंड्याचं प्रभावी …

बांगलादेशी खेळाडूचा हवेत शॉट, फिल्डर बघून रोहितने केला देवाचा धावा…

अ‍ॅडलेड, 02 नोव्हेंबर: अ‍ॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात आलेला भारत आणि बांगलादेश संघातला सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. या सामन्यात अखेर …