Video : चिखलात फुलणारं हे फुलं वेचताना कमळवेड्या माणसाची भन्नाट कल्पना

Trending Video : आपण कायम हे वाक्य ऐकतं आलो आहोत. चिखलात फुलतं कमळ…सुंदर, मनमोहक, प्रसन्न करणारं हे फुलं भारताचं राष्ट्रीय फुलं…या फुलाला देवीच्या पूजेत महत्त्व तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अशा या कमळाची (lotus) शेती आणि तो चिखलातून कसा वेचला हे कधी पाहिलं आहे का? आज आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ (Video) दाखविणार आहोत जो पाहून तुमची सकाळ नक्कीच प्रसन्न होईल. एक कमळवेड्या आजोबांचा (old man video) हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) आम्हाला दिसला. इंस्टाग्रामवरील (Instagram) keralatourism या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

आजोबांची भन्नाट आयडिया

खरं तर या फुलाचं नाव कमळलीली म्हणजेच कमळ कुमुदिनी…कमळाच्या तीन जाती आहेत. या जातीतील काही फुलं ही दिवसा फुलणारी आहेत. तर काही रात्री फुलणाऱ्या असतात. दिवसा फुलणाऱ्या कमळलीलींना सूर्यमुखी, तर रात्री फुलणाऱ्या कमळलीलींना चंद्रमुखी असं म्हटलं जातं. 

तामिळनाडू, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कमळाची शेती केली जाते. गुलाबी, सुंदर असं हे मनमोहक फुलं वेचण्यासाठी एक आजोबा भन्नाट आयडिया काढतात. चिखलातून हे फुलं वेचणं जरा कठीणचं…पण या आजोबांनी अगदी सहज चिखलातून अलगद कमळाचं फुलं तोडलं. हा व्हिडिओ म्हणजे क्षणात शुभ सकाळ करणारा…एक सकारात्मक उर्जा देणारा…

हेही वाचा :  डॉ. नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळायला उशीर झाला - सुप्रिया सुळे | Dr narendra dabholkar murder case witness recognised murderers Supriya Sule - vsk 98

कमळ फुलाविषयी माहिती (Lotus Flower Information In Marathi) 

कमळ फुलाला भारतीय धर्मशास्त्रात, धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये विशेष महत्त्व आहे. नवरात्र, धनत्रयोदशी तसंच लक्ष्मीपूजन आणि देवीच्या पूजेत कमळ या फुलाला खास महत्त्व आहे. तुम्ही पाहिलं असेल सर्व देवदेवतांच्या हाती कमळ असतेच. असं म्हणतात, भगवान विष्णूच्या नाभीतून कमळाचा जन्म झाला आहे. तर त्या कमळासोबत भगवान ब्रह्मापण प्रगट झाले.

सुंदर मनमोहक आरोग्य हितकर ! 

पद्म, अरविन्द, नलिन, महोत्पल, सहस्रपत्र, शतपत्र, पंकेरुह, तामरस अशी कितीतरी नावे कमळाकरीता आली आहेत. कमळाचे फूल सुंदर मनमोहक, विविध रंगात आपल्याला बघायला मिळते. कमळ फुलाला धार्मिक महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे पण याशिवाय कमळ सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

कमळाचे बीज कमलनाल, कमल काकडी, कमलकंद, याचा भाजीकरीताही उपयोग केला जातो. कमळ हे पाण्यात उगवणारे असल्याने तो थंड असतो. आयुर्वेदात कमळाच्या फुलांचा लेप आहे रंग उजळण्यासाठी उपयुक्त सांगितला आहे. उन्हाळा वा शरद ऋतुमधे शरीराची उष्णता त्वचेची आग कमी करण्याकरीता कमळाच्या फुलांना वाटून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्यास तुम्हाला फायदा होतो. 

हेही वाचा :  What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'

याशिवाय किडनीचे विकार, मूत्रसंसर्ग, गॅस, अस्थमा या विकारांवर कामनयनी हे कमळ उपयुक्त आहे. कमळ हे उत्तम शक्तिवर्धक आणि रोगप्रतिकारक असल्यामुळे सर्दी, खोकला, कफ, दूषित रक्तावर, रक्तशुद्धीकरणासाठी, विषबाधा झाल्यास उपयोगात येते. 

मनमोहक व्हिडिओ

तामिळनाडू, केरळ, ओडिसा या राज्यांमध्ये कमळाच्या फुलांचा ज्यूस, कमळफुलाचे सरबत, कमळांचे कमळकंद, कमळ चटणी, कमळ पावडर, कमळांच्या बियांपासून बनविली जाणारी खीर बनवली जाते.कमळदेठाची भाजी, भजी, कबाब, लोणचे केले जाते. कमळाच्या पानांची भजीही चविष्ट बनते. अगदी कमळाच्या पानांपासून जेवणाच्या पत्रावळीही तयार केली जाते. 

 एक गोष्ट लक्षात घ्या कधीही कोणाला तुच्छ लेखू नका. कारण चिखलात फुलणारं फुलदेखील देवाच्या चरणी अपर्ण केलं जातं. शिवाय आरोग्यापासून अगदी खाण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …