डॉ. नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळायला उशीर झाला – सुप्रिया सुळे | Dr narendra dabholkar murder case witness recognised murderers Supriya Sule – vsk 98


अशा कृती पुरोगामी विचारांच्या महराष्ट्रात होऊ नये, याच्यासाठी सगळ्यांनी जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. दाभोलकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. खुनाच्या नऊ वर्षांनी या प्रकरणातली ही मोठी घडामोड समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला असं वाटतं नरेंद्र दाभोलकरांना न्याय मिळायला उशीर झाला आहे. या प्रकरणात कडक कारवाई व्हायला हवी. दाभोलकर कुटुंबाचं योगदान फक्त महाराष्ट्रापुरतंच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाचं आहे. त्यांच्या क्रूर हत्येचा जाहीर निषेध सर्वांनीच केला आहे. अशा कृती पुरोगामी विचारांच्या महराष्ट्रात होऊ नये, याच्यासाठी सगळ्यांनी जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे”.

हेही वाचा – मोठी बातमी! नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्यांची ओळख पटली; साक्षीदाराने दिली महत्त्वाची साक्ष

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून त्यांची हत्या झाल्याची घटना घडली. त्यावेळी त्या पुलावर साफ सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आलं आणि कावळ्यांचा आवाज देखील आला.

हेही वाचा :  Weather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

साक्षीदार तिकडे पाहत असताना, एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या,व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळस्कर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …