वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; ‘आरआरआर’मधील शोले गाणं रिलीज

RRR song Sholay : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आज  29 वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी आलियाचा जन्म झाला. बालपणापासूनच आलियाला अभिनयाची आवड आहे.  वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. तिचा आरआरआर (RRR)हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज वाढदिवसानिमित्त आलियानं तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. या चित्रपटामधील शोले (Sholay) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

शोले या गाण्यामध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांच्यासोबत आलिया थिरकताना दिसत आहे. या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर एम. एम. करीम हे आहेत. तर हे गाण विशाल मिश्रा, बेनी दयाल,  साहिथी चगन्ती आणि हरिका नारायण यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार रिया मुखर्जी या आहेत. 

एसएस राजामौली यांनी आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती  डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये आलिया, ज्यूनियर एनटीआर, राम चरण यांच्यासोबतच अजय देवगण देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

हेही वाचा :  शाहरुखच्या 'पठाण'नं आठव्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …