केसांवर ३ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, हेअरफॉलपासून सुटका

Fenugreek Seeds Use For Hair: मेथी दाण्यात फॉलिक अ‍ॅसिड, विटामिन ए, विटामिन के आणि विटामिन सी सारख्या पोषक तत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात.

केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे होतात आणि याबाबतीत आम्हाला ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हीही याचा उपयोग करून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – iStock)

हेअर फॉलपासून वाचण्यासाठी मेथीचा वापर

हेअर फॉलपासून वाचण्यासाठी मेथीचा वापर

Fenugreek Seeds Uses For Hair Loss: महिला अथवा पुरूषांमध्येही आजकाल केसगळती ही अत्यंत कॉमन समस्या झाली आहे. ज्याचा उपाय करण्यासाठी मेथी दाणे चांगला पर्याय आहे.

  • २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा
  • सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरमधून वाटून पेस्ट करून घ्या
  • ही मेथीची पेस्ट तुम्ही केसांना लावा आणि साधारण २० मिनिट्स तसंच ठेवा
  • त्यानंतर माईल्ड शँपूच्या मदतीने केस धुवा. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ वेळा याचा वापर करावा
हेही वाचा :  पावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट

कोंडा घालविण्यासाठी मेथी दाण्याचा वापर

कोंडा घालविण्यासाठी मेथी दाण्याचा वापर

Fenugreek Seeds Uses For Dandruff: काही व्यक्तींना कोंड्याची समस्या कायम असते. तर हिवाळ्यात कोंड्याचा त्रास अधिक होतो. कोंड्यासाठी मेथी दाण्याचा अधिक चांगला वापर करता येऊ शकतो.

  • दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पेस्ट करून घ्या
  • त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा
  • ही पेस्ट केसांना लावा आणि ३० मिनिट्स ठेवा
  • त्यानंतर केस माईल्ड शँपूने धुवा. असं केल्याने कोंडा लवकर जाईल

(वाचा – मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे समीकरण केसांसाठी ठरते फायदेशीर, कसे वापरावे घ्या जाणून )

केसांना मुलायम ठेवण्यासाठी

केसांना मुलायम ठेवण्यासाठी

Fenugreek Seeds Uses For Soft Hair: केसांना मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीही मेथी दाण्याचा उपयोग करता येतो. तसंच यामुळे केसगळतीही थांबते.

  • केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी एक चमचा मेथी पेस्ट आणि १ चमचा नारळाचे दूध मिक्स करा
  • ही पेस्ट केस, स्काल्पला मुळापासून लावा. पेस्ट लावताना बोटांचा वापर करा
  • २० मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाणी आणि शँपूने धुवा

(वाचा – कोरफड आणि नारळाचे तेल रात्रभर केसांना लावले तर मिळतील अफलातून फायदे, केसांची वाढ थांबणार नाही)

हेही वाचा :  एका आठवड्यात थांबेल केस गळणं, घनदाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले रामबाण उपाय

मेथी दाण्याचे केसांसाठी फायदे

मेथी दाण्याचे केसांसाठी फायदे

Fenugreek Seeds Benefits For Hair: मेथीमध्ये अनेक विटामिन्स आणि प्रोटीन्स असतात जे केसांचे आरोग्य चांगले राखण्यास फायदेशीर ठरते. मेथीतील लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्यास तसंच केस अधिक सुंदर आणि मजबूत होण्यास मदत करते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी डाएटमध्येही याचा समावेश करू शकता. मेथी दाण्याचे पाणी पिणेही सोयीस्कर ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या ब्युटिशियन अथवा हेअर केअर एक्स्पर्टचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …