पावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, ‘या’ भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra Rain : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ आली आहे. अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई पुण्यासह देशभरातही विविध ठिकाणी विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भक्तांना पावसात भिजतच  गणेश विसर्जन करावे लागणार आहे. पावासाबाबत हवामान खात्याने अत्यंत महत्वाचा अलर्ट दिला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडणार आहे.  

पुढील 24 तास महत्वाचे

हवामान विभागाने पावासाचा अंदाज वर्तवला आहे.  पुढील 24 तास महत्वाचे असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

पावसाची दमदार बॅटिंग

पुढील 24 तासांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये दडी मारून बसलेल्या पावसानं सप्टेंबरमध्ये चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागानं जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय.

हेही वाचा :  वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर

मुंबईत गणेश विसर्जानाची धुम

मुंबईत गणेश विसर्जनाची धुम पहायला मिळाला आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच मुंबईचा महाराजा यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. 

पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू 

पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झालीय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती आणि गुरुजी तालीमचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. मानाच्या गणपतींची मिरवणूक हा देखणा सोहळा असतो…. ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना निरोप दिला जातो. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला ‘त्यांना…’

राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप …

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने …