महागाई सोसत टोमॅटो खरेदी केले खरे; आता ते खराब होऊ नयेत यासाठी वापरा ही खास ट्रिक

Tomatoes Storage Tips: टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. राज्यात एक किलो टॉमेटोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. नागपूरात तर टोमॅटोच्या दराने 200 रुपये गाठले आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या जेवणात सहज आढळणारा पदार्थ आहे. टोमॅटो नसेल तर काही पदार्थ अपूर्णही राहतात. आंबट डाळ किंवा ग्रॅव्हीची भाजी करायची झाल्यास टोमॅटोची गरज भासते.  दर वाढल्याने आता गृहिणींनी जेवणात टोमॅटो घालण्यास हात आखडता घेतला आहे. तसंच, सध्या पावसाळा असल्याने भाज्या लवकर खराब होतात. अशावेळी महागडे टोमॅटो (Tomato) आणूनही खराब झाल्यास गृहिणींच्या मनाला चुटपूट लागून राहते.  

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकता. टोमॅटो विकत घेतल्यानंतर ते काटकसर करुन वापरले जातात. भाव अधिक वाढतील या भीतीने सर्वसामान्यांनी आता आहे त्या किमतीला टोमॅटो खरेदी करुन ठेवले आहेत. मात्र पावसामुळं दीर्घकाळापर्यंत टोमॅटो स्टोअर करण्यात अडचण येते. कारण दमट हवामानामुळं ते नरम पडतात अशावेळी महाग टोमॅटो दीर्घकाळापर्यंत स्टोअर कसे करावेत, ही एक सोपी ट्रिक आहे. 

सर्वप्रथम बाजारातून विकत आलेले टोमॅटो स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यावेत. टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर सुती कापडाने पुसून घ्यावेत. त्यानंतर काही काळासाठी टोमॅटो हवेवर ठेवून वाळवून घ्यावेत. टोमॅटोवर पाणी थोडदेखील शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. 

हेही वाचा :  kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत

टोमॅटो स्वच्छ सुकवून घेतल्यानंतर एक मेणबत्ती पेटवून घ्यावी. टोमॅटो वाळल्यानंतर त्याच्या वरच्या भागाजवळ असलेल्या देठावर या मेणबत्तीचे वितळलेले मेण ओतून टोमॅटो सील करुन घ्यावेत. जेव्हा तुम्ही कधी टोमॅटो वापरायला काढाल तेव्हा त्याच्या देढाजवळील मेणाचा भाग काढून मगच टोमॅटो वापरायला घ्यावेत. ही ट्रिक वापरुन.

टोमॅटोऐवजी हे पर्याय वापरु शकता 

दरम्यान, भाजीत व डाळीत टोमॅटो न घालताही तुमची भाजी चमचमीत होऊ शकते. टोमॅटोसाठी हे काही पर्याय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही जेवणात कोकम, चिंच, लिंबू असा वापर करु शकता. डाळ बनवत असताना त्यात दोन ते तीन कोकम किंवा चिंचेचा रस टाकू शकता. त्यामुळं तुमची डाळ छान आंबटगोड होईल. त्याचबरोबर भाजी करत असताना तिखटपणा कमी करण्यासाठी टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबाचा रस पिळून टाकू शकता. त्यामुळं तिखटपणाही कमी होईल आणि भाजी चटपटीतही होईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …