Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट

Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (controversial statement) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची आज सकाळी 9.30 वाजता भेट घेणार आहेत. त्यांच्याकडे राज्यपालासंदर्भात नाराजी व्यक्त केली जाणार आहे. त्यानंतर उदयनराजे सकाळी 10 वाजता प्रसार माध्यमांशीही चर्चा करणार आहेत. त्यामुळे मोदी काय निर्णय घेणार आणि उदयनराजे काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला आहे. (Maharashtra Political News ) महाराजांनी सर्वधर्म समभाव विचार दिला. जुलमी राजवटीतून मोकळा श्वास महाराजांनी दिला. शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. राज्याला विचार देणाऱ्या महाराजांचीच विटंबना. महाराजांचा अपमान. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत. काहीजण समर्थनाच धाडसंही दाखवता. ‘महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी थेट रायगडावरुन विचारला होता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आक्रोश आंदोलन केले होते. तसेच कोश्यारी यांच्याविरोधातआझाद मैदानात एल्गार पुकारण्याचा इशाराही दिलाय.

हेही वाचा :  टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा 'इतकीच' पगारवाढ

संभाजीराजेही प्रचंड संतप्त

दरम्यान, राज्यपाल  कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला आहे. बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. सरकारकडून राज्यपालांना हटवले जाणार असे म्हटले जात होते. मात्र, अद्यापही त्यावर कोणातही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांना राज्याच्या बाहेर पाठवा नाहीतर महाराष्ट्र बंद होइल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिला आहे. 

राज ठाकरे यांचाही इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी कर्नाटक सरकारला (Karnataka Government) इशारा दिला आहे.  कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून टार्गेट केलं आहे. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करुन मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये, असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :  मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय

राज ठाकरे म्हणाले, मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.

13 डिसेंबरला पुणे बंदची हाक

 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानाचा वाद शमायला तयार नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला पुणे बंदची (Pune Band) हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadhi) पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.  या बैठकीला मुस्लिम संघटना (Muslim Organizations) त्याचबरोबर इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांची बदनामी यापुढील काळामध्ये सहन करुन घेतली जाणार नाही जे बदनामी करतील त्यांच्या घरावरती न सांगता आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा :  तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …