Himachal Pradesh Assembly Election Result: हिमाचल प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण?; ही तीन नावे चर्चेत, काँग्रेसची महत्वाची बैठक

Himachal Pradesh Assembly : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress)  स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस नेते विजयी उमेदवारांची घेणार भेट आहेत. आज काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. काँग्रेसचा कोणताही आमदार फुटू नये म्हणून नेत्यांनी आतापासून काळजी घेण्यास सुरुवात केलेय. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तीन नाव चर्चेत आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हिमाचल काँग्रेसची बैठक, ही तीन नावे चर्चेत

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. पक्षाने 43.90 टक्के मते मिळवून 40 जागा जिंकल्या आहेत. आता पुढील मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चांना उधाण आले आहे. शर्यतीत तीन नावांचा उल्लेख केला जात असून त्यात सुखविंदर सिंह सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. प्रतिभा सिंह खासदार असूनही त्यांनी निवडणूक लढवली नाही. तर सखू आणि अग्निहोत्री यांनी आपापल्या जागा जिंकल्या आहेत. अन्य दोन नेते आशा कुमारी आणि कौल सिंह ठाकूर हे जवळपास शर्यतीतून बाहेर पडले आहेत. कुमारी डलहौसीमधून 6 वेळा आमदार राहिल्या आहेत. त्यांनी आपली जागा गमावली आहे. तर 8 वेळा आमदार ठाकूर यांचाही मंडईतील द्रांग भागातून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा :  Manipur violence: गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक

आमदारांची आज शिमला येथे बैठक

काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची शुक्रवारी शिमला येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा (CLP) नेता निवडण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांना अधिकार देणारा ठराव मंजूर केला जाऊ शकतो. यापूर्वी, पक्षाने आपल्या सर्व आमदारांना चंदीगडला बोलावले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आपला कार्यक्रम बदलला. हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याने काँग्रेसला आनंद आहे. ते म्हणाले की काँग्रेस ’10 हमी’ पूर्ण करण्यासाठी आणि लोकांना चांगले प्रशासन देण्यासाठी सर्व काही करेल.

मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील नेत्यांचा अल्प परिचय

सुखविंदर सिंह सुखू

सुखविंदर हे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रचार समितीचे प्रमुखही आहेत. त्यांनी मध्य हिमाचलमधील नादौन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तीन वेळा आमदार राहिलेल्या सखू यांची पक्षात चांगली पकड आहे आणि ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अधिकृतपणे सखू म्हणाले की मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्ष हायकमांड घेईल. 

मुकेश अग्निहोत्री

चार वेळा आमदार राहिलेले मुकेश अग्निहोत्री विरोधी पक्षनेते आहेत. हिमाचल प्रदेशातील हरोली मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. सीमांकनापूर्वी त्यांची जागा संतोकगड म्हणून ओळखली जात होती. 2003 मध्ये ते या जागेवरून पहिल्यांदा निवडून आले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अग्निहोत्री यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते म्हणून निवड झाली.

हेही वाचा :  युद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी

प्रतिभा सिंह

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या प्रतिभा सिंह या पत्नी आणि हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. 2004 मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांनी महेश्वर ठाकूर यांचा पराभव केला. 2013 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी याच जागेवरून भाजप नेते जयराम ठाकूर यांचा पराभव केला होता. भाजपचे राम स्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.  

काँग्रेसने 40 जागा जिंकल्या

काँग्रेसने 40 जागा जिंकल्या, तर भाजपला 43 टक्के मते मिळूनही केवळ 25 जागा जिंकता आल्या. अनेक जागांवर कमी मतांच्या फरकाने विजय-पराजय निश्चित झाला. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले.  मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने सर्व 68 जागांवर निवडणूक लढवली, तर आम आदमी पक्षाने (आप) 67 जागांवर, बहुजन समाज पक्षाने 53 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी  11 जागांवर उमेदवार उभे केले. AAP आपले खाते उघडण्यात अयशी झाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …