“तुझ्या मनात भारतासाठी…”; शेन वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरचे भावनिक ट्विट


भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरही वॉर्नच्या निधनाने दुखावला आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ बळी घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणीत १३१९ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. वॉर्नच्या निधनानंतर भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरनेही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत भारतात शेन वॉर्नसाठी नेहमीच खास स्थान होते, असे म्हटले आहे. स्तब्ध वॉर्नी, तुझी आठवण येईल. तुझ्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळवाणा क्षण आला नाही. मैदानावरील आपले शत्रुत्व आणि बाहेरचे विनोद नेहमी लक्षात राहील. तुझ्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुमच्यासाठी विशेष स्थान होते,” असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शेन वॉर्नच्या निधनावर अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारताच्या अनिल कुंबळे, वसीम जाफर आणि हरभजन सिंग यांनी वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने, “यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. संपूर्णपणे धक्का बसला, एक महान आणि जगातील महान खेळाडूंपैकी एक, तू खूप लवकर निघून गेलास. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांबद्दल शोक व्यक्त करतो,” असे म्हटले आहे.

हेही वाचा :  मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …