रॉड मार्शना श्रद्धांजली अन् 12 तासात शेन वॉर्नचा मृत्यू; शेन वॉर्नचे ‘हे’ शेवटचे ट्वीट चर्चेत

Shane Warne Passes Away: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचा वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नचे निधन हा ऑस्ट्रेलियाला एकाच दिवसात बसलेला दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले, त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शेन वॉर्नने एका ट्वीटच्या माध्यमातून 12 तासांपूर्वीच रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. 

शेन वॉर्नने रॉड मार्शच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “रॉड मार्श यांच्या मृत्यूच्या वृत्ताने दु:ख झालं. ते क्रिकेटचे लिजेंड होत आणि अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” 

 

रॉड मार्शना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याने क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. हा धक्का ऑस्ट्रेलियासाठी खूपच मोठा होता, कारण एकाच दिवसात दोन महान खेळाडूंना या देशाला मुकावं लागलं आहे. 

हेही वाचा :  'रायडूचंही करिअर असंच संपलं' संजू सॅमसनला वगळल्यानं माजी क्रिकेटपटू बीसीसीआयवर भडकला!

महत्त्वाच्या बातम्या; 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …