‘ये रेशमी झुल्फे ये शबनमी आँखे’, मराठमोळ्या मृणालच्या नैसर्गिक सौंदर्याचा कहर

मृणाल ठाकूरचे नैसर्गिक सौंदर्य अनेकांना आवडते. सोशल मीडियावरही तिचे अनेक चाहते आहेत. मृणालच्या फोटोजना नेहमीच पसंती मिळत असते. ग्लॅम लुक असो अथवा नैसर्गिक लुक असो मृणालची स्टाईल आणि फॅशन सर्वांनाच आवडते.

पिवळ्या क्रॉप टॉप आणि जीन्समधील काही फोटो मृणालने पोस्ट केले असून मोकळ्या केसांमधील तिच्या अदांनी इंटरनेटवर सध्या चाहते घायाळ होताना दिसून येत आहेत. क्युट स्माईल आणि मोकळ्या केसातील मृणालच्या सौंदर्यावर फॅन्स फिदा झाले आहेत. मृणालचा लुक पाहूया (फोटो सौजन्य – @mrunalthakur Instagram)

हवेवर भुरभुरणारे केस

हवेवर भुरभुरणारे केस

हवेवर भुरभुरणारे केस आणि त्यावर स्टायलिश टोपी असा लुक करत मृणालने लक्ष वेधून घेतले आहे. मृणालचा हा फोटो पाहातच राहावा इतका सुंदर आहे. नैसर्गिक सौंदर्यात तिच्या केसांमुळे अधिक भर पडली आहे.

पिवळा क्रॉप टॉप आणि जीन्स

पिवळा क्रॉप टॉप आणि जीन्स

मृणालने यामध्ये साधा पिवळा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स घातली असून वेगळी अशी काहीही स्टाईल केलेली नाही. मात्र तिच्या या साध्या स्टाईलमुळे चाहत्यांचे मन तिच्या सौंदर्याकडे अधिक आकर्षित होताना दिसून येत आहे.

हेही वाचा :  L01–501 जवळ माझ्या गर्लफ्रेंडचा मृतदेह; तरुणाच्या सुसाइड नोटमध्ये सीक्रेड कोड, नवी मुंबईतील त्या हत्येचे गूढ अखेर समोर

(वाचा – Exclusive: ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलच्या कुरत्यांची वेगळीच कमाल, नृत्यच नाही तर फॅशनही अनोखी)

मोकळे केस आणि हुप्स ईअररिंग्ज

मोकळे केस आणि हुप्स ईअररिंग्ज

या फॅशनसह तिने केवळ हुप्स ईअररिंग्ज घालून लुक पूर्ण केला आहे. मित्रमैत्रिणींना भेटायला जाताना अथवा एखाद्या ठिकाणी पटकन पोहचायचे असेल तर असा लुक तुम्हीही करू शकता. मृणालचे केस मोकळे असून तिने वेव्ही लुक दिला आहे.

(वाचा – ‘मी भिजून पुरी आता झाले ओली’…अश्विनी कासारचा वेड लावणारा लुक, हिरव्यागार साडीतील फोटो तुफान व्हायरल)

ओल्या केसात न्हाऊन मी…

ओल्या केसात न्हाऊन मी…

अत्यंत साधा मात्र तितकाच आकर्षक असा ओल्या केसांचा लुक मृणालने शेअर केला असून तिच्या साधेपणावर चाहते अधिक फिदा झालेले दिसून येत आहेत. अत्यंत साधा आणि गर्ल नेक्स्ट टू डोअर लुक केल्यामुळे मृणालच्या सौंदर्यात भर पडली आहे.

(वाचा – Exclusive: सुरभी हांडेचा मनमोहक लुक, नऊवारीतला साज आणि नथीचा नखरा करतोय घायाळ)

नो मेकअप लुक

नो मेकअप लुक

कोणताही मेकअप नाही आणि नैसर्गिक लुक यामुळे मृणालवर कौतुकाचा वर्षावही होताना दिसून येत आहे. कोणताही मेकअप बेस पण मृणालने या लुकमध्ये केलेला नाही. नैसर्गिक सौंदर्य अधिक उठावदार दिसते.

हेही वाचा :  टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा भयंकर कॅन्सर

प्रत्येक वेळी सुंदर दिसण्यासाठी मेकअपची गरज नाही, नैसर्गिक सौंदर्यातही अभिनेत्री सुंदर दिसू शकतात हे मृणालच्या स्टाईलवरून दिसून येतेय.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …