WhatsApp वर सेंट झालेला मेसेज आता एडिटही करता येणार, अगदी सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली : WhatsApp Edit Message feature Launch : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. दरम्यान युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सॲप देखील नवनवीन फीचर्स आणत असतं. आता देखील कंपनीने एक बहुप्रतिक्षीत असं फीचर फायनली लाँच केलं आहे. दरम्यान बऱ्याच वेळापासून युजर्सची मागणी असणारं हे Edit Message फीचर आता आयफोन युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे.
ज्यामुळे व्हॉट्सॲपमध्ये आजवर एखादा मेसेज चूकून सेंट झाला तर तो डिलीट करावा लागत होता. पण आता एका नव्या फीचरमुळे चुकून सेंट झालेले चुकीचा मेसेजही एडिट करता येणार आहे. व्हॉट्सॲपने याबद्दल दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ‘एक चूकीचा मेसेज सुधारण्यासाठी आम्ही हे फीचर आणलं असून आम्ही या फीचरमुळे फारच आनंदी आहोत. तुम्हाला मेसेज एडिट करण्यासाठी फक्त त्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागणार असून त्यानंतर लगेचच एडिट करता येणार आहे.’

CEO मार्क झुकरबर्गने आधीच दिली होती माहिती
व्हॉट्सॲप हे मेटा कंपनीच्या मालकिचं ॲप असून मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी काही दिवसांपर्वी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत या एडिट फीचरची माहिती दिली होती. त्या फोटोवर व्हॉट्सॲपमध्ये सेंड झालेल्या एका मेसेजमध्ये एडिटींग होत असल्याचं दिसत आहे. तर याच्या कॅप्शनमध्ये मार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणाही मेसेज सेंड झाल्यावर १५ मिनिटांपर्यत एडिट केला जाऊ शकतो असंही सांगितलं आहे.

हेही वाचा :  WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी... जाणून घ्या सविस्तर माहिती

कसा कराल व्हॉट्सॲप मेसेज एडिट?

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज फक्त १५ मिनिटापर्यंतच एडिट करता येणार असल्याने त्याची काळजी घ्यावी.
  • तर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट अपडेटनंतर कोणताही सेंट झालेला मेसेज एडिटचा ऑप्शन येणार आहे.
  • यासाठी फक्त सेंट झालेल्या चुकीच्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागेल, ज्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील. मग Edit Message चा ऑप्शन दिसेल.
  • Edit Message वर टॅप केल्यावर त्यात हवा तो बदल करु शकाल आणि पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.वाचा : NASA News : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची कमाल, एकाच फोटोत सामावल्या ४५ हजार आकाशगंगा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …