टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा स्टार गोलंदाज बर्मिंगहॅम कसोटीला मुकण्याची शक्यता

ENG vs IND: भारताला पुढील महिन्यात इंग्लंडशी रिशेड्युल कसोटी सामना खेळायचा आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी  इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी कोरोनामुळं भारत- इंग्लंडमधील अखेरचा कसोटी सामना होऊ शकला नव्हता. चार कसोटी सामन्यांनंतर टीम इंडिया सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. यापूर्वीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स ॲंडरसनला (James Anderson)  दुखापत झालीय. तसेच तो भारताविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बेन स्टोक्स काय म्हणाला?
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. न्यूझीलंडविरुद्ध लीड्स येथे आजपासून (२३ जून) सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जेम्स अँडरसनचा समावेश नाही. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितले की, अँडरसनला दुखापत झाली आहे. त्यामुळं तो तिसऱ्या कसोटीत सहभागी होणार नसल्याचं स्टोक्सनं म्हटलंय. जेम्स ॲंडरसनची दुखापत इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. आम्हाला भारताविरुद्ध मोठा कसोटी सामनाही खेळायचा आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे? याची मला खात्री नाही. पण भारताविरुद्ध कसोटी सामन्यातही जेम्स ॲंडरसनचं खेळणं कठीण वाटत आहे”, असंही स्टोक्सनं म्हटलंय.

भारताविरुद्ध जेम्स ॲंडरसनची चमकदार कामगिरी
जेम्स ॲंडरसन 39 वर्षांचा आहे. त्याच वय हा त्याच्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. भारताविरुद्ध जेम्स ॲंडरसननं आतापर्यंत भेदक गोलंदाजी केली आहे. त्यानं मायदेशात भारताविरुद्ध 21 कसोटी सामन्यात 99 विकेट्स घेतले आहेत. 

 जेम्स ॲंडरसनचे कसोटी क्रिकेटमधील 650 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जेम्स ॲंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 651 विकेट्सची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांजांच्या यादीत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीधरन 800 विकेट्स सह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर आपल्या फिरकीच्या जादूनं कसोटीत 708 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाजी शेन वार्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा-

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IND vs ENG : टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! खेळाडूंनी सुरु केला सराव

India vs England : भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या पहिला कसोटी …

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा सामनाही अनिर्णित, चीनविरुद्ध स्कोर 1-1

FIH Womens Hockey World Cup 2022 : सध्या सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय (India) संघ …