बॅंक ऑफ बडोदा पदभरतीसाठी(BOB SO Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्जप्रक्रिया (BOB SO Recruitment 2022) २२ जूनपासून सुरू झाले आहेत. या पदभरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ३२५ पदे भरली जातील.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २२ जून २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जुलै २०२२
रिक्त जागांचा तपशील
रिलेशनशिप मॅनेजर- ७५ पदे
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट- १०० पदे
क्रेडिट विश्लेषक- १०० पदे
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट- ५० पदे
BOB Job 2022: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पात्रता निकष
रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवाराने फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (किमान १ वर्षाचा अभ्यासक्रम) केलेला असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ४२ वर्षादरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४८ हजार १७० ते ६९ हजार १८० रुपये पगार दिला जाणार आहे.
क्रेडिट विश्लेषक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. किंवा उमेदवाराकडे वित्त किंवा CA/CMA/CS/CFA या विषयातील विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी असावी. या पदासाठी उमेदवाराचे वय २८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६३ हजार ८४० ते ७८ हजार २३० रुपये पगार दिला जाणार आहे.
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि सीए असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान असावे. ७६ हजार ते ८९ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
अर्ज शुल्क
अनुसूचित जाती/जमाती/अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी)/ महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क तर सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा