ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार-इशानला संधी, जाडेजाचं पुनराग

Indian Squad: ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिला कसोटी सामना होणार आहे. या संघ निवडीतील मधील सर्वात मोठी बाब म्हणजे, रविंद्र जाडेजा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव होय.. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादल आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुखापतीनंतर रविंद्र जाडेजा संघात पुनरागमन करतोय. 

रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तर केएल राहुल उपकर्णधार असेल. त्याशिवाय पंतच्या अनुपस्थितीत केएस भरत याला विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आलेय. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. पण तो फिटनेस टेस्ट पास केली तरच संघाचा भाग असेल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलेय. जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलेलं नाही. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) – 
 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

हेही वाचा :  IPL 2022, KKR vs PBKS : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघात महत्वाचे बदल

news reels

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …