बीसीसीआयकडून तिन्ही फॉरमॅटसाठी संघ निवड करताना संजू सॅमसनकडे दुर्लक्ष, चाहते संतप्त

Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (13 जानेवारी) वेगवेगळ्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली. दरम्यान स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची तीनपैकी कोणत्याही फॉरमॅटमध्ये निवड झाली नाही. यामध्ये बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड केली. तिन्ही संघातून संजू सॅमसनचे नाव नाही.

संजू सॅमसन भारतीय संघात नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. संजूला संघात न निवडल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर चांगलच टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.  बीसीसआयवर टीका करत संजूला टीममध्ये न घेण्याचं कारण जाणून घेण्याचा काहींनी प्रयत्न केला. तर यातील काही पोस्ट पाहूया…

news reels

संजू श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघात होता

हेही वाचा :  भारत-न्यूझीलंड वन-डे मालिकेला सुरुवात, मैदानाची अन् हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा सविस्तर

जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत संजूला संघाचा भाग बनवण्यात आले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. मात्र, त्या सामन्यात त्याला केवळ 5 धावाच करता आल्या होत्या. यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो पुढील दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होता. विशेष म्हणजे बीसीसीआयने संजूच्या हेल्थबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे का? की त्याची निवड न करण्यामागे आणखी काही कारण आहे, त्याबाबत काहीही समोर आलेले नाही.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …