इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून घेण्याला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण देण्यासाठी ( engineering in mother tongue) गेल्या वर्षी २० कॉलेजांना मान्यता दिली होती. मात्र, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून यंदा कॉलेजांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी इच्छुक कॉलेजांसाठीचे प्रस्ताव आज, २९ मार्चपासून एआयसीटीईच्या (AICTE) पोर्टलवर स्वीकारण्यात येतील,’ अशी माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सोमवारी दिली.

एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया (EPSI) आणि एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी माहिती दिली. डॉ. सहस्त्रबुद्दे म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत आंतरविद्याशाखीय शिक्षणाला रुजवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मातृभाषेतील शिक्षण हे अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कळते. असाच प्रयोग आता उच्च शिक्षणात होण्याची आवश्यकता आहे.’

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइनपद्धतीने शिक्षण घेता आले नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणपद्धती राबविण्यात आली. या ऑनलाइन शिक्षणाचा १०० टक्के विद्यार्थ्यांना फायदा झाला, असे म्हणता येणार नाही. मात्र, ७० टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नक्कीच टाळता आले.’

हेही वाचा :  यूजीसी आणि AICTE कडून क्रॉसवर्ड स्पर्धा २०२२ च्या नोंदणीला सुरुवात

करोना काळात पालक गमावलेल्या पुणे विद्यापीठाच्या ५०७ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

मराठवाडा विद्यापीठ सत्र परीक्षा होणार ऑफलाइन

‘वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याची आवश्यकता’

‘एआयसीटीईने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांचे मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी कार्यवाही केली आहे. आता विधी, वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण मातृभाषेतून देण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊन काम करणाऱ्यांचा संपर्क दररोज देशातील नागरिकांशी येतो. त्यामुळे मातृभाषेतून विद्यार्थ्यांना शिकायची संधी मिळाल्यास, विद्यार्थ्यांच्या समजून घेण्याच्या क्षमतेत अमूलाग्र बदल होतील,’ असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या
चीनमधील शिक्षण भारतात ग्राह्य नाही; UGC, AICTE ने दिला इशारा
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण; MUHS चा निर्णय

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …