Tag Archives: desh videsh News

Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा …

Read More »

Russia Ukraine War : रशियाचे हल्ले तीव्र, युक्रेनमध्ये हाहाकार ; २००० नागरिकांचा बळी

किव्ह : रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखी तीव्र केल़े. आठवडय़ाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून, उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चतता आह़े. रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि …

Read More »

Russia Ukraine War : भारतीयांच्या स्थलांतरासाठी रशियाकडून मानवतावादी मार्ग ; नवनियुक्त रशियन राजदूतांची माहिती; सुरक्षेसाठी दिला निर्वाळा

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचे …

Read More »

Ukraine War: जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानी विद्यार्थी घेतायत भारतीय तिरंग्याचा सहारा

युक्रेनमधून रोमानियात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली माहिती ; तुर्की विद्यार्थ्यांना देखील तिरंग्याची झाली मदत रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवर हवाई हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियासमोर शरणागती पत्कारण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. परिणामी युक्रेनचं रुपांतर सध्या युद्धभूमी झाल्यासच पाहायला मिळत आहे. या युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर पडताना दिसत आहे. …

Read More »

सोलापूर: साखरपुड्यासाठी पुण्याला गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा; आठ लाख ५५ हजारांचे दागिने लंपास

सोलापुरमधील एका व्यापाऱ्याच्या घरावर चोरांनी आठ लाखांचा डल्ला मारल्याची घटना घडलीय. सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथे राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यात ही चोरी झालीय. चोरांनी बंगल्याचं कुलूप तोडून घरातील तब्बल आठ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आलीय. व्यापाऱ्याच्या घरामध्ये घडलेला चोरीचा प्रकार काल (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी …

Read More »

Russia Ukraine War: खनिज तेलाचा दर शंभरी पार, सात वर्षातला उच्चांक; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार?

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता. आता तीच भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या ७ वर्षांतला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता १०६ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि …

Read More »

Ukraine War: बायडेन यांचा हल्लाबोल! म्हणाले, “पुतिन हुकूमशहा आहेत, ही लढाई…”

आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अ‍ॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार टीका केलीय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचा उल्लेख हुकूमशहा असा केलाय. राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अ‍ॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन आज सात दिवस उलटले असून त्यानंतरही युद्ध सुरुच आहे. याच …

Read More »

Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

रशियन राष्ट्राध्यक्षांनीच युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत सात दिवसांपूर्वीच युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन सध्या चर्चेत आहेत. आता पुतिन यांच्या पाठोपाठ त्यांचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. रशियामधील एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमीनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राउण्ड सिटीमध्ये पाठवलं आहे. हे शहर …

Read More »

Russia Ukraine War News Live Updates: चर्चेच्या पहिल्या अयशस्वी फेरीनंतर आज दुसरी फेरी; युद्धसमाप्तीच्या घोषणेची आशा

Russia Ukraine World War Live: रशिया आणि युक्रेन दरम्यान चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. Russia Ukraine Crisis Live Today, 02 March: युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली असताना खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय …

Read More »

भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू ; युक्रेनमध्ये संघर्ष तीव्र, वेगवान मदतकार्याचे भारतापुढे आव्हान

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली असताना खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले असून, देशापुढे वेगवान मदतकार्याचे आव्हान उभे ठाकले आह़े नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा (२१) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकातील …

Read More »

सत्या नाडेला यांचे पुत्र झेन यांचे निधन

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचे पुत्र झेन नाडेला (वय २६) यांचे निधन झाल्याची माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे मंगळवारी देण्यात आली. झेन हे जन्मापासून बहुविकलांगता (सेरेब्रल पाल्सी) विकाराने ग्रस्त होते. ‘मायक्रासॉफ्ट’च्या प्रवक्त्यांनी सांगितले, की नाडेला यांचे पुत्र झेन यांच्या निधनाचे वृत्त देताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. नाडेला सध्या आपल्या शोकाकुल परिवारासोबत आहेत. त्यांच्या मुलाच्या निधनावर समाजमाध्यमांवर …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत अडकलेल्या पत्नी व मुलासाठी लंडनच्या शिक्षकाने नोकरी सोडली अन् गाठलं युक्रेन!

प्रवासादरम्यान सोशल मीडियाद्वारे आपल्या वन मॅन मिशनचे वेळोवेळी दिले आहे अपडेट “माझी पत्नी आणि मुलगा युक्रेनमध्ये असताना मी इथे बसून राहू शकत नाही. युक्रेनचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुतीन यांच्यामुळे धोक्यात आली आहे.” अशी फेसबुकवर पोस्ट करत लंडनमधील इयान उमने नावाचा इंग्रजी विषयाचा एक शिक्षक नोकरीचा राजीनामा देऊन, स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला आहे. त्याने हे वन मॅन मिशन …

Read More »

“आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास….”; पुतिन यांचा जगभरातील देशांना पुन्हा इशारा

रशियाकडून युक्रेनवर हल्ला सातत्याने सुरू आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिका या रशियाला या युद्धाच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला की, “रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास …

Read More »

Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत युद्धाची घोषणा केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी …

Read More »

Maha Shivratri 2022: देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई …

Read More »

“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून …

Read More »

Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रहमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रहमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा …

Read More »

Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं …

Read More »

रशियाचा दोन शहरांवर ताबा ; युक्रेनशी शांतता चर्चेची पहिली फेरी निष्फळ, दुसरी लवकरच

किव्ह :राजधानी किव्हसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.    रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही …

Read More »

फ्लावर नही फायर! ‘या’ कॉकटेलच्या मदतीने युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध उतरले रणांगणात

युक्रेनचं सरकारही नागरिकांना हे कॉकटेल्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. चार दिवसांच्या जोरदार हल्ल्यांनंतर आणि शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर संपूर्ण युक्रेनमधील सामान्य नागरिक रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत शस्त्रे हाती घेत आहेत. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत फारसे सक्षम नसतानाही – आतापर्यंत रशियन आक्रमणाचा जिद्दीने प्रतिकार करून नागरिक दररोज हिरो ठरत आहेत. ही लढाई उल्लेखनीय आहे कारण युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन …

Read More »