धावत्या एक्स्प्रेसमध्ये निवृत्त जवानाकडून पुन्हा गोळीबार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Firing in Sealdah New Delhi Rajdhani Express: धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार (Firing) झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये (Sealdah New Delhi Rajdhani Express) एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या एका मद्यधुंद निवृत्त सैनिकाने गुरुवारी रात्री सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. आरोपी हरपिंदर सिंग धनबादहून रेल्वेच्या बी-8 बोगीत चढला होता. गाडी मातारी स्थानकावरून जात असतानाच हरपिंदर सिंगने त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. त्यामुळे बोगीत गोंधळ निर्माण झाला. हरपिंदर सिंग धनबाद येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच ट्रेनमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर राजधानी एक्सप्रेस कोडरमा स्थानकावर थांबवण्यात आली आणि आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी बी-8 बोगीच्या टॉयलेटमधून एक काडतुस जप्त केले आहे. आपल्याकडून चुकून गोळी सुटल्याचे हरपिंदर सिंगचे म्हणणे आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे.

हेही वाचा :  एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; 'या' ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा

या सगळ्या प्रकारानंतर गुरुवारी रात्री हरपिंदरला रात्री उशिरा वैद्यकीय उपचारासाठी कोडरमा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर त्याला ट्रेनने धनबादला आणले जाईल. त्याच्यावर धनबादच्या रेल्वे स्थानकात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी हरपिंदरकडून रिव्हॉल्व्हरशिवाय त्याचे नवी दिल्लीचे आरक्षण तिकीट जप्त केले आहे. त्याचे आरक्षण हावडा राजधानीत होते पण तो मद्यधुंद अवस्थेत सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला. सीट नसल्याने तो बी-8 बोगीच्या टॉयलेटशेजारी उभा होता.

मद्यपान केल्यामुळे त्याला नीट उभं राहता येत नव्हत असं म्हटलं जात आहे. त्यामुळे गोळी सुटली असावी असा अंदाज लावला जात आहे. मात्र गोळीबारामागील नेमके कारण पोलीस शोधत आहेत. या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. आरपीएफ आणि रेल्वे पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्येही अशीच घटना घडली होती. 31 जुलै रोजी, रेल्वे सुरक्षा दलाचा माजी कॉन्स्टेबल चेतन सिंग चौधरी याने त्यांचे वरिष्ठ टिकाराम मीणा आणि इतर तीन प्रवाशांची ट्रेनमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. पहाटे 5 ते 5.15 च्या दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. आरोपी चेतन सिंगने प्रथम  त्याच्या वरिष्ठ एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच डब्यातील एका प्रवाशावरही गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपी पँट्री कारमधून पुढे गेला आणि तिथल्या तिसऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. त्यानंतर चेतन सिंगने पॅन्ट्री कारच्या समोर असलेल्या एस 6 डब्यातील चौथ्या व्यक्तीला गोळ्या घातल्या.

हेही वाचा :  महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, 'मी स्वत:..'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …