न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करुन सूर्याने मिळवला सामनावीराचा पुरस्कार,टी20 सामन्यांत रचला इतिहास

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या सर्वात दमदार फॉर्मात असणारा फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). टी20 क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने हा पुरस्कार मिळवत विराट कोहलीचा एक रेकॉर्ड तोडून इतिहास रचला आहे.

एका कॅलेंडर ईयरमध्यये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार मिळवण्याचा रेकॉर्ड सूर्याने केला आहे. 2016 मध्ये विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 6 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. सूर्यकुमारने या वर्षात भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी 6 वेळाच हा पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे विराट आणि सूर्या दोघेही एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामनावीराचे किताब जिंकण्याच्या शर्यतीत समान होते. पण सूर्यकुमारने आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामनावीर जिंकण्याचा मान मिळवला आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सामनावीराचा मान मिळवला आहे.

हेही वाचा :  'सूर्यकुमार पाकिस्तानात असता तर...'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या वक्तव्यानं सर्वच चकीत

सूर्याची दमदार कामगिरी सुरुच

सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) येऊन अजून दोन वर्षेही झाली नाहीत, पण त्याने आपला चांगलाच दबदबा निर्माण केलाय. मार्च 2021 मध्ये टी20 क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने आतापर्यंत 41 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 45 च्या दमदार सरासरीने 1 हजार 395 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने आतापर्यंत दोन शतकं आणि 12 अर्धशतकं ही झळकावली आहेत. विशेष म्हणजे सूर्याने एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी20 ठोकण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्याआधी रोहित शर्माने 2018 मध्ये हा रेकॉर्ड केला होता. सूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या फलंदाजीमध्ये तब्बल 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले.  T20 इंटरनॅशनलमध्ये सूर्यकुमारबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राइक-रेट आहे कारण त्याने सुमारे 180 हून अधिकच्या स्ट्राइक-रेटने धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकातही जवळपास सर्वच सामन्यात तो दमदार फॉर्मात होता. 

Reels

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …