‘अजून 12 लाख मिळाले नाहीत’; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना धक्कादायक दावा

Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. बालरुपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी राम भक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. मात्र, अरुण योगीराज यांना रामलल्लाच्या मूर्तीसाठी नव्हे तर म्हैसूर महानगरपालिकेने वोडेयार घराण्याच्या राजाच्या पुतळ्याच्या शिल्पासाठी पैसे दिलेले नाहीत.

भाजप आमदार बसनगौडा आर पाटील यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट लिहीली. ‘2016 मध्ये अरुण योगीराज यांनी श्री जयचामराजेंद्र वोडेयर यांचा पुतळा बनवला होता. त्याला आजपर्यंत एकूण आठ वर्षे झाली, पण म्हैसूर महापालिकेने योगीराज यांना कामाचा मोबदला दिलेला नाही. हा एका शिल्पकाराचा तसेच यदुवंशाच्या राजाचा अपमान आहे,’ असे बसनगौडा आर पाटील यांनी म्हटलं आहे.

बसनगौडा पाटील यांनी दावा केला की, म्हैसूर महानगरपालिकेकडे अद्याप 12 लाख रुपये आहेत, जे योगीराजांना द्यावे लागतील. त्यावर म्हैसूर महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, योगीराज यांना पैसे दिले नसल्याची अद्याप कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. ते रेकॉर्ड तपासतील आणि त्यानंतर भाजप आमदाराच्या आरोपांना उत्तर देतील. दरम्यान, ही थकबाकी अरुण योगीराज यांच्या हार्डिंग सर्कलमध्ये बसवलेल्या जयचामराजा वाडियार पुतळ्याच्या कामाशी संबंधित आहे.

हेही वाचा :  Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...

दुसरीकडे, म्हैसूर महापालिकेचे माजी महापौर शिवकुमार यांनीही या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांना 12 लाख रुपये देण्यास म्हैसूर महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. “म्हैसूर महापालिकेने केलेल्या कामाचा मोबदला न देऊन प्रसिद्ध शिल्पकाराला कसे वागवले हे धक्कादायक आहे. अरुण योगीराज यांनी अयोध्येत बालकराम मूर्तीचे काम करून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली असून म्हैसूर महापालिका त्यांना त्रास देत आहे. किमान आता तरी, म्हैसूर महापालिकेने आपली चूक लक्षात घेतली पाहिजे आणि म्हैसूरच्या कलात्मक आणि सांस्कृतिक वारशासाठी त्यांचे योगदान ओळखून थकबाकीची रक्कम दिली पाहिजे,” असे शिवकुमार म्हणाले.

शुक्रवारी पत्रकारांनी बोलताना अरुण योगीराज यांनीही या प्रकारावर भाष्य केलं. ‘म्हैसूर महापालिकेने मला 2015 मध्ये जयचामराजा वाडियार पुतळ्यासाठी केलेल्या कामाचे 12 लाख रुपये दिले नाहीत. तेव्हापासून मी महापालिकेकडे गेलो नाही,’ असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सहा हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. दुसऱ्या दिवसापासूनच राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रामलल्लांच्या दर्शनासाठी दररोज लाखो लोक मंदिरात पोहोचत आहेत. तीन मूर्तींपैकी एक मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यासाठी निवडण्यात आली होती. रामलल्लांची ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.

हेही वाचा :  Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठेसाठी राम लल्लाची मूर्ती ठरली? ती का आहे इतकी खास?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …