Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध ‘तो’ एकटा नडला; पाहा VIDEO

Indian High Commission in UK: ब्रिटनमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी (Khalistanis) रविवारी ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर (Indian High Commission) हल्लाबोल केला आणि घोषणाबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर खलिस्तानी गटांनी जोरदार घोषणाबाजी करत दूतावासावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज खाली (Indian National Flag) उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण दिसत होतं.

भारताविरोधात दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच खलिस्तानी झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भारताने या प्रकारावर ब्रिटनकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आंदोलकांनी अमृतपाल सिंहची पोस्टर्स या परिसरात झळकावली. मात्र खलिस्तानींचा ध्वजाची विटंबना करण्याचा प्रयत्न दूतावासातल्या एका भारतीय अधिकाऱ्याने हाणून पाडला. 

‘तो’ एकटा भिडला…

तिरंगा अर्ध्यावर उतरवल्यावर (Khalistanis pull down Tiranga) तातडीने अधिकारी जागे झाले. दूतावासातील एक अधिकारी एकटा या जमावाला भिडला. त्यांनी भारताचा ध्वज आपल्या ताब्यात घेतला. वर चढलेला खलिस्तानी हा प्रकार पाहातच राहिला. पहिला प्रयत्न फसल्यावर खलिस्तान्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

आणखी वाचा – Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? अमेरिकेत राडा; जाणून घ्या प्रकरण!

हेही वाचा :  चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली अन् शहराबाहेर झाला मृत्यू; रात्रभर आईला कवटाळून रडत होता मुलगा

दरम्यान, आंदोलनवेळी वर चढलेल्या खलिस्तान्याने त्याच्या हातातला पिवळा झेंडा तिरंग्याच्या जागी फडकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या भारतीय अधिकाऱ्याने त्याच्या हातातला झेंडा हिसकावून खाली फेकून दिला. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं देखील दिसून आलं. काही वेळ तणावाचं वातावरण दिसत होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन शांत केलं.

अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी प्रयत्न

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची  (Punjab Police) शोधमोहीम वेगाने सुरू आहे. 18 मार्चपासून सुरू झालेल्या पंजाब पोलिसांची कारवाईमध्ये आतापर्यंत 112 जणांना अटक केली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …