Success Story: शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना, कोणतेही कोचिंग न लावता लेक झाली कलेक्टर

IAS Officer Tapasya Parihar: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करुनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी जोरदार बनतो. यातूनही मार्ग काढणारे उमेदवार समाजासाठी आदर्श ठरतात. शेतकऱ्याच्या मुलगी असलेल्या मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या तपस्या परिहारचा आयएएस बनण्याचा प्रवास जाणून घेऊया. तपस्याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासोबतच ऑल इंडिया २३ वा क्रमांक मिळवून टॉपर्समध्येही आपले स्थान निर्माण केले.

मूळ मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील जोवा गावात २२ नोव्हेंबर १९९२ रोजी तपस्याचा जन्म झाला. तपस्याने तिचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर तिने इंडियन लॉ सोसायटीच्या लॉ कॉलेज, पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले.

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तपस्या परिहारने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच प्रयत्नात ती यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या प्रिलिममध्ये नापास झाली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर तपस्या परिहारने दुसऱ्या प्रयत्नात आणखी मेहनत घेण्याचे ठरवले आणि आत्मअभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :  CTET निकालास उशीर झाल्याने सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

Success Story: आयपीएस लेकीला ड्युटीवर वडिलांकडून सॅल्यूट, सिंधुच्या यशाची थक्क करणारी कहाणी

MPSC Recruitment: परीक्षा उत्तीर्ण करुनही हजारो विद्यार्थ्यांवर मुलाखतींसाठी वाट पाहण्याची वेळ
तपस्याने दुसऱ्या प्रयत्न करत पुन्हा अभ्यास सुरू केला. जास्तीत जास्त नोट्स बनवणे आणि मॉडेल प्रश्नपत्रिका सोडवणे हे तिचे ध्येय होते. तपस्या परिहारने तिच्या अभ्यास करण्याची पद्धत बदलली आणि यशासाठी कठोर परिश्रम केले. कोणतेही कोचिंग क्लास लावण्यास तिने नकार दिला आणि सेल्फ स्टडीवर तिने जोर दिला. अखेरीस, या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०१७ मध्ये तिने ऑल इंडिया २३ वा रॅंक मिळविला.

तपस्याचे वडील विश्वास परिहार हे शेतकरी आहेत. जेव्हा तिने आपल्या कुटुंबाकडून यूपीएससीची तयारी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा संपूर्ण कुटुंब ठामपणे तिच्या पाठिशी उभे राहिले. २०२१ मध्ये तपस्या परिहारने आयएफएस अधिकारी गरवीत गंगवारशी लग्न केले. तपस्या आणि गरवीत यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली.

धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना कितवी शिकली? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …