Stillbirth म्हणजे काय? गर्भधारणेदरम्यान घ्या ही काळजी नाहीतर….

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यानंतर जेव्हा बाळाचा गर्भात मृत्यू होतो, तेव्हा या स्थितीला Stillbrith असे म्हणतात. प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीच्या वेळी बाळाच्या मृत्यूलाही स्टिलबर्थ असे म्हणतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, 175 पैकी 1 जन्म हा मृत जन्म असतो. गेल्या 30 वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, जन्मपूर्व काळजी सुधारली आहे, ज्यामुळे मृत जन्माच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. येथे आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने गर्भवती महिलेला मृत जन्माचा धोका कमी करता येतो. (फोटो सौजन्य – iStock / प्रातिनिधिक फोटो)

डॉक्टरांची प्रतिक्रिया

डॉक्टरांची प्रतिक्रिया

डॉ. चेतना रमाणी, रामकृष्ण केअर हॉस्पिटल, रायपूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात, मृत जन्माचा धोका कमी करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. ज्यामध्ये आईचे वय, वजन, बीएमआय, कोणतेही अनुवांशिक रोग, कौटुंबिक इतिहास, वैद्यकीय विकार आणि जीवनशैली यासारख्या जोखीम घटकांचा समावेश आहे. हे घटक ओळखून ते दूर करणे आवश्यक आहे.

(वाचा – Mahashivratri 2023: भगवान शिवशी संबंधित मुलींची ही अद्भुत नावे, राहील शंकराचा कृपाशिर्वाद)​

हेही वाचा :  आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे

याकडे दिले लक्ष

याकडे दिले लक्ष

डॉ. अर्चना सांगतात की, स्टिलबर्थमध्ये घट झाली आहे आणि निरोगी गर्भधारणा आणि सुरक्षित प्रसूतीसाठी समाजाने एकत्रितपणे काम केले पाहिजे. आई आणि बाळाच्या आरोग्याकडे लक्ष देऊन आणि मृत जन्मदर कमी करणे हे आपले ध्येय बनवून आपण या दिशेने यशस्वी होऊ शकतो.

(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)

एंटी-नेटल काळजी महत्वाची

एंटी-नेटल काळजी महत्वाची

राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार, गर्भवती महिलांनी गर्भधारणेतील कोणतीही सोनोग्राफी चुकवू नयेत. काही चाचण्या आहेत ज्यांच्या मदतीने एखाद्या विशिष्ट वेळी संभाव्य समस्या शोधली जाऊ शकते. यामुळे तुमचे बाळ गर्भात किती सुरक्षित आहे हे कळू शकते.
​(वाचा – भाग्यश्रीच्या सौंदर्याप्रमाणेच मुलांची नावे ही आकर्षक, ‘इ’ अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ)​

ऍक्टिव राहा

ऍक्टिव राहा

गर्भवती महिलांनी अस्वस्थ अन्नापासून दूर राहून सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त वजन किंवा लठ्ठपणा गर्भधारणेमध्ये समस्यांचा धोका वाढवू शकतो. गर्भधारणा ही वजन कमी करण्याच्या आहारावर जाण्याची वेळ नाही, परंतु जर तुमचे आधीच जास्त वजन असेल तर तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान योग्य असा डाएट नक्की फॉलो करावा.

हेही वाचा :  "पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम

याशिवाय, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या 28 व्या आठवड्यानंतर पाठीवर झोपल्यानंतर मृत जन्माचा धोका दुप्पट होतो. असे मानले जाते की ,पाठीवर झोपल्यास बाळाला रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह प्रतिबंधित होतो. यावेळी आपण आपल्या एका कुशीवर झोपणे आवश्यक आहे. डाव्या कुशीवर झोपल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

​(वाचा – EXCLUSIVE : शिव ठाकरेच्या नावाचं रहस्य उलगडलं, आई या नावाने मारते हाक)​

सिगारेट आणि दारूपासून दूर रहा

सिगारेट आणि दारूपासून दूर रहा

तुम्ही दारू किंवा सिगारेटचे सेवन करत असाल तर ते लगेच बंद करा. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसोबत किंवा त्याच्या आजूबाजूला राहणे देखील आई आणि मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे धूम्रपानापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान अल्कोहोल किंवा धूम्रपान सोडण्यास त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या एक्सपर्टची मदत देखील घेऊ शकता. लक्षात ठेवा की, या दोन्ही गोष्टी तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी विष आहेत.
(वाचा – या संतांच्या नावावरून मोहम्मद कैफने ठेवलंय मुलाचं नाव, भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …