Solapur Income Tax Raids : आयकर विभागाचे व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे

 Income Tax Raids at  Solapur : सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. ( Income Tax Raid) बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. (Maharashtra News in Marathi) या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

 50 कोटी रुपयांचे व्यवहार बोगस 

 सोलापुरातील आसरा चौक कुमठा नाका हैदराबाद रोड परिसरामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत.  या छाप्यांमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने हे छापे टाकलेत आहेत.

भंगार विक्रेत्यांचा रोखीने व्यवहार

यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आलेय.

याआधी सोलापुरात छापेमारी

मुळगाव रोड येथील एका कत्तलखाना चालवणाऱ्या कंपनीवर ही छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यातून धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधी ऑगस्ट 2022 मध्येही सोलापूर (Solapur) शहरात देखील  आयकर विभागाने धाडसत्र (IT Raids) टाकले होते. व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्यावतीने चौकशी सुरु होती.  सोलापुरातील व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी झडती घेतली होती. सोबतच अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाने झाडाझडती घेतली होती.

हेही वाचा :  महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

तसेच जालन्यामध्ये आयकर विभागाने शेकडो कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरात एकाच वेळी 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. सर्वाधिक छापेमारी ही कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर पडली होती. 

आतापर्यंत या ठिकाणी छापेमारी 

– मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
– अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
– अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
– व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
– स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
– डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
– रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)
– पंढरपूर येथे एका साखर कारखान्यावर छापा
– नांदेड येथे  एका ठिकाणी छापा
– बीड येथे एका ठिकाणी छापा
– उस्मानाबाद येथे दोन ठिकाणी छापेमारी
– कोल्हापूर येथे एका ठिकाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …