शाहिदचं घर कार्तिक आर्यनने घेतलं भाड्याने

Shahid Kapoor, Kartik Aaryan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. कार्तिक हा शाहिदच्या घरात भाड्याने राहणार आहे. त्याने शाहिदचे जुहू येथील घर भाड्याने घेतलं आहे. शाहिदचा हा सी-फेसिंग फ्लॅट आहे. 

रिपोर्टनुसार, शाहिदने त्याचा हा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. हा फ्लॅट प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. या फ्लॅटसाठी कार्तिकने 45 लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. या फ्लॅटचे पहिल्या वर्षाचे भाडे 7.50 लाख रुपये आहे. हे भाडे दर वर्षी 7 टक्याने वाढणार आहे. रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन दुसऱ्या वर्षी 8.2 लाख आणि रु. तिसऱ्या वर्षी 8.58 लाख भाडे भरेल. या फ्लॅटसोबत कार्तिकला दोन कार पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत. 

वांद्रे वरळी सी-लिंक जवळील बिल्डिंगमध्ये शाहिदचं नवं घर

चार वर्षांपूर्वी शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक जवळ असलेले आलिशन घर विकत घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून या घराच्या इंटरिअरचे काम सुरु होते. मीरा ही या घराच्या इंटेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. रिपोर्टनुसार, या घराची किंमत 58 कोटी रुपये आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जवळील ‘360-वेस्‍ट’ या बिल्डिंगच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचे हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे. तर कार्तिक आर्यन वर्सोवा येथे अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने हे अपार्टमेंट 2019 मध्ये 1.60 कोटींना खरेदी केले होते. 


कार्तिक हा नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. तर शाहिदच्या चित्रपटांना देखील त्याच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या ‘जर्सी’, कबीर सिंह, पद्मावत, जब वी मेट यांसारख्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहिद आपल्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिद आणि मीरानं 2015मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना झेन आणि मीशा ही दोन मुलं आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

हेही वाचा :  Gangubai Kathiawadi : गंगूबाईंच्या नातीने संजय लीला भन्साळींवर केले गंभीर आरोप

Shahid Kapoor: वांद्रे वरळी सी-लिंक जवळ शाहिद अन् मीरानं घेतलं आलिशान घर; किंमत वाचून डोळे विस्फारतील  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …