स्वयंपाक घरात असलेल्या ‘या’ 5 गोष्टींचा वापर केल्यानं त्वचा होईल ग्लोइंग

Home Remedies for Glowing Skin :आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या त्वचेवर खूप लक्ष देतात. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट्स देखील वापरता. घरच्या घरी तर अनेक गोष्टी लोक वापरताना दिसतात. मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत, जे घरी बेसण आणि हळदीचा फेसपॅक लावतात. हळदीचा फेसपॅक लावल्यानं चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसतो. त्यात जर आणखी दुध घातलं तर चेहऱ्यावर असलेली घाण निघून जाते. पण हळद सोडून घरच्या घरी अशा अनेक गोष्टी मिळतील ज्या तुम्ही तुमची सुंदरता वाढवण्यासाठी वापरू शकता. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी ग्लोइंग त्वचेसाठी काही टिप्स… यात जायफळ, दूध, दालचीनी, नारळाचं तेल आणि मधाचा समावेश आहे. 

जायफळ 
तुमच्या त्वचेसाठी जायफळ हे खूप महत्त्वाचं आहे. जायफळची अर्धा चमचा पावडर घ्या आणि त्यात एक चमचा दूध मिक्स करा. त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करा तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर 15-20 मिनिटे ठेवा. हा फेस पॅक सुकल्यानंतर पाण्यानं धुवून घ्या. तुमची त्वचा नक्कीच ग्लोइंग दिसेल. 

दूध
दूध आपल्या त्वचेचा ग्लो खूप वाढवतं. दूधात लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेवरील डेड स्किन सेल्स कमी करण्यास मदत करते. दूधाला चेहऱ्यावर लावल्यास नक्कीट फायदा होईल. त्यासाठी जवळपास 10 मिनिट दूधानं चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर धूवून घ्या चेहरा नक्कीच चमकदार होईल. 

हेही वाचा :  डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर

दालचीनी
दालचीनी हा प्रत्येक स्वयंपाक घरात असलेला महत्त्वाची वस्तू आहे. भाज्यांमध्ये दालचीनी घातल्यास जेवण चविष्ट होतं. पण दालचीनीचे अनेक फायदे आहेत. चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर दालचीनीचा वापर करा. दालचीनी आणि मध एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट 10 मिनिट राहू द्या त्यानंतर थंड पाण्यानं धूवून काठा. त्यानं चेहरा सॉफ्ट राहिल. 

हेही वाचा : मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा ‘हे’ जुगाड

नारळाचं तेल
त्वचेला मॉइस्चराइज ठेवण्यासाठी नारळाचं तेल खूप फायदेकार आहे. त्यासोबत तुमची त्वचा ही हायड्रेटेड राहिल. नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. 

मध
मधात जे एन्टी ऑक्सीडेंट्स असतात ते आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. चेहऱ्याला थोडं ओलं करा त्यानंतर त्यावर मध लावा. हे 5-10 मिनिट चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्याला धुवून घ्या. 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …