‘साहेब, मला न्याय द्या हो!’; न्यायासाठी वृद्ध महिलेचा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या

प्रफुल्ला पवार, झी मीडिया, रायगड: आजकाल आपल्या शहरात आणि जिल्ह्यात वृद्धांसोबत गैरप्रकार (old age fraud) घडताना दिसत आहेत. त्यांची अनेकदा फसवणूक केली जात आहे. छोट्या मोठ्या कारणांवरूनही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. आधी वृद्धांना वृद्धाश्रमात टाकण्याचा फंडा (old age home वाढू लागला होता तर मध्यतंरी वृद्धांना फसवून त्यांचा खून केल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या होत्या. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचं आणि भितीचं वातावरण होतं. अनेकदा तरूण मुलं आपल्या आईवडिलांना (parents and children relationships) मोठं झाल्यावर वाऱ्यावर सोडताना दिसतात त्याचं पुढे काय होतं याचा कोणालाच काहीच थांगपत्ता लागत नाही. असे प्रकार अनेकदा घडत असल्यानं वृद्धांच्या सुरक्षिततेचा (senior citizens security) प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या असे प्रकारही वारंवार घडताना दिसतात परंतु वृद्धांची फसवणूकही अनेकदा होताना दिसते आहे. अशा घटनाही वारंवार घडताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) समोर आला आहे. (an old age woman begs for her land which was fraudly taken away from her)

पडित महिला आपल्या सहकाऱ्यासह कार्यालयाबाहेर ठय्या मारून बसली आहे. आपल्याला आवश्यक असतील अशी सगळी कागदपत्र (papers) तिनं यावेळी आपल्यासोबत आणलेली पाहायला मिळाली. आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय (justice) द्या नाहीतर आत्मदहन करेन अशाप्रकारे ही माहिला विनवण्या करताना दिसते आहे.  

हेही वाचा :  'अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी...'; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर

हेही वाचा – पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्… थराराक घटना

काय घडला प्रकार? 

एका वृद्ध महिलेच्या बाबतीत असाच एक गंभीर फसवणूकीचा (fraud with a old age woman) प्रकार घडला आहे. ज्यामुळे तिला न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. सध्या या प्रकारानं सगळीकडूनच संताप व्यक्त केला जातो आहे. रजनी कासकर या वयोवृध्द महिलेने आज कर्जत तहसीलदार यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. रिलायन्स पाईप लाईनसाठी (Relience pipelines) संपादित जमिनीचे पैसे (money) देतो असे सांगून आपली जमीन हडपल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेला कुठलीही कल्पना न देता या जागेची खरेदी करण्यात आली. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात (police) गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यात महसूल विभागातील कर्मचारी षडयंत्र करून जमीन लाटणाऱ्यानाच सहकार्य करीत असल्याची या महिलेची तक्रार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे (chief minister) तक्रार करून देखील महसूल विभाग सहकार्य करीत नाही. आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा या महिलेनं दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. 

हेही वाचा :  Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल

हेही वाचा – Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

काय म्हणाल्या रजनी कासकर? 

माझी 6 एकर जमीन होती. त्यातून मला पैसे मिळतील असं सांगितलं आणि मला फसवलं. त्यातून पाईप लाईन लावून देऊ असा प्रकारही सांगितला पण त्यातून काही पैसे दिले नाहीत. त्या सहा एकरच्या जागेचे या फसवणूक करणाऱ्या लोकांनी कागदपत्र करून घेतले आणि त्या कागदावर माझ्या सह्या करून घेतल्या. मला सांगितलं की यातून जमिनीतून तुम्हाला आम्ही 70 लाख देणार आहोत. ती जागा चोरी झालेली आहे. अशी आमची फसवणूक केली आणि मग आम्ही केस (case) चालू केली, अशी तक्रार केल्यावर त्यांनी मग आरोपींची नावंही सांगितली. आमची एवढीच मागणी (demands) आहे की, अशा प्रकारे फसवणूक करून त्यांनी आमची जागा चोरी केलेली आहे. तर त्यांनी ती आम्हाला मिळवून द्यावी. तहसीलदार आमच्या तक्रारीला काहीच पांठिबा देत नसून तो तारिखही पुढची देतो आहे. मी म्हातारी बाई सारखी सारखी कशी त्यांच्याकडे जाणार, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

काय म्हणाले वकील? नक्की प्रकरण काय? 

रजनी यांची 11 एकर जागा आहे. त्यातील 6 एकर जमीन (land) फसवणूक करून विकण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयात या प्रकरणात पुढची तारिख देण्यात आली आहे. रजनी यांनी 1994 साली 11 अकरा एकर जागा खरेदी केली त्यांच्याकडे सात बारा नसल्या कारणानं कोणतरी त्यांना या जागेबद्दल पैसे मिळवून देतो असं सांगितल्यावर त्यांनी त्यांच्याकडून प्रक्रिया केली आणि त्यांना याबाबतीत फसवलं, अशी माहिती वकील प्रमोद सुर्वे यांनी दिली. 

हेही वाचा :  काचेचा ब्रीज अचानक फुटला, 30 फूट खाली कोसळले पर्यटक; अंगावर शहारे आणणारा VIDEO



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी ‘असे’ बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!

Sukh Sagar Success Story : आयुष्यात काहीतरी करायचा ठाम निर्णय घेतला तर अनेक अडचणींवर तुम्ही …

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Central Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल …