Shani Vakri 2022: शनिदेव १४१ दिवस असतील वक्री, ‘या’ तीन राशींच्या संकटात होईल वाढ


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो किंवा राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो किंवा राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कर्म दाता शनिदेव या वर्षी २९ एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश करतील आणि ५ जून रोजी कुंभ राशीत राहून वक्री अवस्थेत जातील. २३ ऑक्टोबरपर्यंत शनि वक्री स्थितीत राहील. शनिदेवाला कलियुगातील दंडाधिकारी म्हणतात. शनिदेव व्यक्तीच्या कृतीनुसार फळ देतात. त्यामुळे शनिदेव वक्री असण्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु तीन राशी आहेत ज्यांच्या अडचणी वाढू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या तीन राशी आहेत.

मेष: तुमच्या राशीपासून शनिदेव अकराव्या स्थानात वक्री राहतील. या स्थानाला उत्पन्नाचे घर म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तसेच व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन गुंतवणूक करणे टाळावे. या काळात अपघात होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहन जपून चालवा. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि शनिदेव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
उपाय- शनि आणि हनुमान चालीसा यांचं पठण करणे फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा :  Astrology 2022: ‘या’ महिन्यात पाच ग्रहांचा मकर राशीत महासंयोग, तीन राशींना होणार आर्थिक लाभ

सिंह: शनिदेव तुमच्या राशीपासून सातव्या भावात म्हणजेच वैवाहिक जीवन, भागीदारीत वक्री आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. भागीदारीच्या कामात कमी फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल नाही. जोडीदाराचे आरोग्यही काहीसे बिघडू शकते. दुसरीकडे, सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव आणि शनि यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही थोडे सावध राहावे लागेल.
उपाय- शनिवारी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. असे केल्याने शनिदेवाच्या आशीर्वादासोबतच लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते.

Surya Gochar: ‘या’ चार राशींचे भाग्य १५ मार्चपासून चमकणार, ग्रहांचा राजा सूर्यदेवाची असेल विशेष कृपा

कर्क: शनिदेव तुमच्या राशीत आठव्या भावात प्रवेश करत आहेत. या स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे यावेळी तुम्हाला काही आजार होऊ शकतो किंवा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. या काळात कोणालाही कर्ज देणे टाळा, अन्यथा पैसे बुडू शकतात. व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे टाळा आणि नवीन बिझनेस ट्रिप देखील करू नका.
उपाय- शनिदेवाच्या मंदिरात शनिदेवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनि चालिसाचे पठण करा.

हेही वाचा :  आजचं राशीभविष्य, गुरुवार, ३ मार्च २०२२



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …