Shane Warne death : शेन वॉर्न वेटलॉससाठी वापरत होते ‘ही’ ट्रिक, काय आहे ही ट्रिक आणि कधी बनते शरीरासाठी घातक?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या निधनामुळे (Shane Warne) क्रिकेटप्रेमींना अजूनही धक्का बसला आहे. 52 वर्षीय शेन वॉर्नचा या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. ते जगातील महान स्पिनर मानले जायचे. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेन वॉर्न गेल्या १४ दिवसांपासून अत्यंत कडक असा लिक्विड आहार (Liquid Diet) घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जे त्यांच्या मृत्यूचे संभाव्य कारण असू शकते. काही दिवसांपूर्वी वॉर्न वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठी ते लिक्विड डाएट फॉलो करत असल्याचं बोललं जात आहे.

वजन, फिटनेस आणि डाएट यासंबंधी एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘ऑपरेशन श्रेड सुरू झाले आहे (10 दिवसांत) आणि जुलैपर्यंत पुन्हा आकारात (body shape) यायचं आहे’. वॉर्नचे मॅनेजर जेम्स एरस्काइन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते एक प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करत आहे. या दरम्यान त्यांनी 14 दिवस फक्त द्रवपदार्थ घेतले होते. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

लिक्विड डाएटमध्ये काय घेत होते वॉर्न

त्यांच्या मॅनेजरने सांगितले की ते खूप कमी खात असत. त्यांच्या आहारात लोण्यासोबत पांढरे बन्स आणि त्यासोबत काळ्या आणि हिरव्या रंगाचा ज्यूस यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. त्यांनी आयुष्याभर भरपूर धूम्रपान केले पण मला वाटते की हा फक्त एक मोठा हृदयविकाराचा झटकाच होता.

(वाचा :- Diabetes and Turmeric : सकाळी रिकाम्या पोटी हळदीत ‘या’ 2 गोष्टी मिक्स करून मिश्रण चाटा, पोट साफ न होणं, अपचन, डायबिटीज, वेदनांपासून मिळेल मुक्ती!)

फास्टिंग टी डाएटवर सुद्धा होते वॉर्न

वॉर्न यांच्या मुलाने सांगितले आहे की त्याचे वडील नियमित 30 दिवसांच्या फास्टिंग टी डाएटवर होते. वॉर्नने मृत्यूच्या काही दिवस आधी डाएट प्लॅन पूर्ण केला होता आणि त्यानंतर व्हेजमाइट टोस्ट खाल्ल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.

(वाचा :- Bone Cancer – सावधान, हाडांचा कॅन्सर होण्याआधी शरीर देतं ‘हे’ 5 संकेत, दुर्लक्ष करू नका अन्यथा गमवावा लागेल जीव..!)

लिक्विड डाएट काय आहे?

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यामध्ये हा डाएट प्लान खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये शीतपेयांच्या माध्यमातून कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न केला जातो. वजन कमी करण्यासाठी लोक लिक्विड डाएटचा अवलंब करतात. यामध्ये फळे आणि भाज्यांचा रस किंवा शेक घेतला जातो. बहुतेक लोक जेवण वगळून त्याजागी दिवसभरात तीन वेळा हेच घेतात.

हेही वाचा :  Home remedies for thyroid : थायरॉइडसाठी अमृत आहे 'हे' घरगुती पाणी, हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितलेल्या पद्धतीने प्या, औषधं होतील बंद..!

(वाचा :- लठ्ठपणामुळे व्हाल डायबिटीजसारख्या 5 भयंकर आजारांचे शिकार, पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या ‘हे’ 4 प्रकारचे घरगुती चहा!)

लिक्विड डाएटमधील धोके काय आहेत?

तथापि, वॉर्नच्या अकाली निधनामागे लिक्विड डाएट हे कारण असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही. हेल्थ एक्सपर्ट्स अशा डाएट बाबत चेतावणीचा किंवा धोक्याचा इशारा देतात. हार्ट फाउंडेशनचे हेल्थ एक्सपर्ट प्रोफेसर गॅरी जेनिंग्स यांच्या मते, कमी-कॅलरीजचे सेवन काही परिस्थितींमध्ये हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

(वाचा :- 120 किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल 37 किलो वजन!)

लिक्विड डाएटमुळे ह्रदयाच्या आरोग्यास धोका

गॅरी जेनिंग्स म्हणाले की अशा आहारामुळे हृदयाशी संबंधित बहुतेक समस्या उद्भवू शकतात. याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. साहजिकच द्रव आहारातून तुम्हाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. असे मानले जाते की कमी कॅलरी असलेल्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे योग्य संतुलन नसते.

(वाचा :- Foods for blood vessels : शरीरातील सर्व कमजोर नसा एका आठवड्यात होतील मजबूत, आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामं..!)

हेही वाचा :  Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

वेटलॉस करत होते शेन वॉर्न

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …