‘दीपिकासारखी अभिनेत्री…’; बेशरम रंग गाण्यावर शाहरुखची प्रतिक्रिया

Pathaan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधील बेशरम रंग (Besharam Rang) आणि झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची देखील मागणी केली होती. आता बेशरम रंग गाण्याबाबत शाहरुखने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.  

काय म्हणाला शाहरुख? 

यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख पठाण चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुखला पठाणमधील दीपिकाच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. यावर शाहरुख म्हणाला, “बेशरम रंग सारखं गाणं करण्यासाठी दीपिकासारखी तोडीची अभिनेत्री हवी असते. केवळ हेच गाणं नाही तर तिने एका अॅक्शन सीनमध्ये एका मुलाला ओढलं आणि मारलं. असे सीन्स करण्यासाठी ती खंबीर आहे. असे कॉम्बिनेशन फक्त दीपिकासारख्या स्टार्समध्येच पाहायला मिळते.” 

हेही वाचा :  Flicker : सत्यघटनेवर आधारित 'फ्लिकर' लवकरच होणार प्रदर्शित

यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

news reels New Reels

पाहा व्हिडीओ: 

 

पठाण चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.  पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन  सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये ‘पठाण’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan Advance Collection: परदेशात ‘पठाण’ चा डंका; रिलीज होण्याआधीच केली बंपर कमाई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …