‘फर्जी 2’ बाबत शाहिद कपूर म्हणाला….

Farzi Season 2 Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटी (Ott) विश्वात पदार्पण केलं आहे. त्याची फर्जी (Farzi)  ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिदसोबतच अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. ही वेब सीरिज अमेजन प्राइमवर (Amazon Prime) रिलीज झाली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या किलर लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या सीरिजच्या दुसऱ्या पार्टची (Farzi Season 2) प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

राज आणि डीके यांची अॅक्शन अँड थ्रिलर असणारी फर्जी ही वेब सीरिज अनेक जण बिंच वॉच करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूरला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत प्रश्न विचारण्यात आला. या शाहिदनं दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.

काय म्हणाला शाहिद? 

एका इव्हेंटमध्ये शाहिदला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत विचारण्यात आलं. याबद्दल शाहिद म्हणाला, ‘फर्जी वेब सीरिजचा दुसरा सीझन नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. पण त्याला थोडा वेळ लागले. दीड ते दोन वर्ष लागू शकतात. एका प्रोजेक्टच्या पोस्ट प्रोडक्शनला एक वर्ष लागतो. त्या प्रोजेक्टला अनेक भाषांमध्ये डब केलं जातं. त्यामुळे मी हे सांगू शकतो की, फर्जी-2 प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागू शकतात.’


शाहिद आणि विजय सेतुपती यांच्यासोबतच फर्जी या सीरिजमध्ये केके मनन, मनोज वाजपेयी,अमोल पालेकर, राशी खन्ना या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील शाहिदनं  सनी नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे. जो बनावट नोटा छापण्याचं काम करतो. फर्जी वेब सीरिजमधील शाहिद आणि विजयच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहे. तसेच या सीरिजच्या दुसऱ्या पार्टीची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या वेब सीरिजच्या दुसऱ्या पार्टमध्ये काय बघायला मिळेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही वाचा :  Maharashtra Shahir : यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार अतुल काळे

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

SAG Awards 2023 : स्टेजवर जाताना तोल गेला अन्…. ; अभिनेत्री जेसिका चॅस्टेनचा व्हिडीओ व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …