Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या ‘पहिल्या लग्नाची खरी गोष्ट’, धक्कादायक वास्तव समोर

Seema Haider Love Story : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सीमी हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणाच्या (Sachin Meena) लव्ह स्टोरीची चर्चा आहे. पबजी खेळता खेळता पाकिस्तानतल्या (Pakistan) सीमाचं भारतातल्या सचिनशी प्रेमसंबंध जुळले आणि आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सीमा पहिल्या पतीला सोडून चार मुलांसह थेट भारतात आली. सचिनबरोबर हिंदुपद्धतीने लग्न केल्याचा दावा तीने केला असून आता पुन्हा पाकिस्तानात जाण्यास तीने नकार दिला आहे. तिचा पहिला पती गुलाम हैदरने सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याची थेट पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे. 

पहिल्या लग्नाची खरी गोष्ट
सीमा हैदरच्या पहिल्या पतीचं नाव गुलाम हैदर असं आहे. कामानिमित्ताने तो सऊदी अरेबियाला असतो. आता तिच्या पहिल्या लग्नाची खरी गोष्ट समोर आली आहे. सीमाने पळून जाऊन गुलाम हैदरशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. गुलाम हैदरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका टीव्ही चॅनेलने केलेल्या याबाबत खुलासा झालाय. सीमाने या सर्व गोष्टींचा इन्कार केला आहे. आपला प्रेम विवाह नाही तर दबात येऊन लग्न केल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. पण एका अॅफिडेव्हिटमुळे सीमा हैदरच्या पहिल्या लग्नाचं सत्य समोर आलं आहे. 

हेही वाचा :  चित्रपटानंतर सीमा-सचिनला आता लाखोंच्या नोकरीची ऑफर, गुजरातच्या उद्योगपतीने पाठवलं पत्र

पहिलं लग्नही पळून 
अॅफिडेव्हिटमधल्या माहितीनुसार सीमा हैदरने पहिलं लग्नही पळून जाऊन केलंय. लग्नाच्या 10 दिवस आधी सीमाने आपलं घर सोडलं होतं. त्यानंतर तीने गुलाम हैदरशी प्रेमविवाह केला. लग्नाच्या अॅफिडेव्हिटमध्ये आपल्या मर्जीने हे लग्न करत असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. मी आपल्या मर्जीने लग्न करत आहे, यासाठी घर सोडलं असून माझ्यावर कोणताही दबाव नाही असं तीने यात म्हटलं आहे. 

हे अॅफिडेव्हिट 2014 साली करण्यात आलं आहे. या अॅफिडेव्हिटमध्ये सीमाने आपल्या वडिलांना लालची म्हटलं आहे. वडिल आपलं लग्न दुसरीकडे करुन देऊ इच्छितात, पण मी गुलामवर प्रेम करते असं तीने यात म्हटलंय. तिचे वडिल ज्या मुलाशी लग्न लावून देऊ इच्छितात तो मुलगा आवारा आणि गुंड प्रवृत्तीचा आहे असंही तीने म्हटलंय. दुसरं खोटं तिच्या वयाबाबत आहे. सीमा हैदरने जे ओळखपत्र दिलं आहे, त्यात तिची जन्मतारिख 2002 आहे. पण पहिल्या लग्नाच्या अॅफिडेव्हिटमध्ये जन्मतारिख वेगळीच आहे. याबाबत सीमाला प्रश्न विचारला असता तीने पहिल्या लग्नावेळी आपलं वय 16-17 असल्याचं सांगितलं.

याशिवाय आपलं शिक्षण कमी झाल्याने जन्मतारीख काय लिहिलीय हे माहित नसल्याचा दावाही तीने केला आहे. पाकिस्तानात अनेकजणं आपलं वय तीन चार वर्षांनी कमी  लिहितात, तिथे वयाचा फारसा प्रश्न उद्भवत नाही असा उलट सवालही तीने केला. सीमा हैदरचा भाऊ पाकिस्तान लष्करात आहे. यावर तिला विचारण्यात आलं असता तीने बोलण्यास नकार दिला. याबाबत जे काही सांगायचं आहे ते भारतीय पोलिसांनी सांगितल्याचं ती म्हणते. 

हेही वाचा :  Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

पाकिस्तानातून भारतात आल्यापासून कुटुंबाशी कोणताही संपर्क झाला नसल्याचं सीमा हैदरने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भाऊ आसिफचा फोन आला होता, पण त्याच्याशी बोलणं झालं नाही. असं तीने सांगितलं. भाजप नेते दुष्यंत गौतम यांनी केंद्र सरकारकडे सीमा हैदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीमा गैरपद्धतीने भारतात आली आहे, तीन इथे कोणत्या उद्देशाने आली? तिचा भाऊ पाकिस्तान लष्करात आहे त्यामुळे याप्रकरणाची गांभार्याने चौकशी व्हावी असं दुष्यंत गौतम यांनी म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …