चित्रपटानंतर सीमा-सचिनला आता लाखोंच्या नोकरीची ऑफर, गुजरातच्या उद्योगपतीने पाठवलं पत्र

Seema Haider-Sachin : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haider) चित्रपटाच्या ऑफरनंतर आता नोकरीचा प्रस्ताव (Job Offered) मिळाला आहे. गुजरातमधल्या एका उद्योगपतीने तीन पानांचं पत्र पोस्टाने पाठवलं आहे. यात दोघांनाही वार्षिक सहा-सहा लाख म्हणजे प्रत्येकी 50 हजार रुपयांची ऑफर दिली आहे. ते कधीही येऊन नोकरी सुरु करु शकतात  असं या पत्रात म्हटलंय. पोलिसांनी या नोकरीचं पत्र त्यांना मिळालं असल्याचं म्हटलं आहे. पण ज्या उद्योगपतीने नोकरीचं पत्र पाठवलं आहे, त्या उद्योगपतीच्या (Businessman) नावाचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. पोलीस या पत्राची तपासणी करत आहेत, हे पत्र खरं आहे की केवळ पब्लिसिटी स्टंट आहे याचा तपासही सुरु आहे. 

सोमवारी पोस्टाचा कर्मचारी पत्र घेऊन ग्रेटर नोएडातल्या सचिन आणि सीमाच्या (Sachin-Seema) रबूपुरा इथल्या घरात पोहोचला. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने सचिनच्या कुटुंबियांना ते पाकिट दिलं. पण सुरक्षेच्या कारणास्तव सचिन आणि सीमाच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून पोलिसांनी पाकिट उघडण्यास नकार दिला. त्यानंतर मंगळवारी सीनिअर पोलीस अधिकाऱ्याला याबाबत माहिती देण्यात आली.  पाकिटावर गुजरातचा पत्ता लिहिण्यात आला होता. सचिन कुटुबिंयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये त्यांचा कोणताही नातेवाईक राहात नाही. त्यामुळे पोलिसांच्या देखरेखी खाली पाकिट उघडण्यात आलं. 

हेही वाचा :  याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

पाकिटात तीन पानांचं पत्र
पाकिट उघडल्यानंतर त्यात तीन पानांचं पत्र होतं. सचिन आणि सीमाच्या नावाने हे पत्र होतं, आणि यात दोघांना नोकरीचा प्रस्ताव देण्यता आला होता. हे पत्र गुजरातच्या एका उद्योगपतीने पाठवलं होतं. यात दोघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये महिना नोकरीची ऑफर होती. तसंच कोणत्याही वेळेला, कोणत्याही दिवशी गुजरातमध्ये येऊन नोकरी जॉईन करु शकता, असं लिहिण्यात आलं होतं. याशिवाय दोघांच सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. 

सचिन-सीमा सोशल मीडियापासून दूर
मिळालेल्या माहितीनुसार सचिन आणि सीमा सध्या आर्थिक संकटाता सापडले आहेत. मीडियाची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असल्याने सचिन-सीमा घराबाहेर पडू शकत नाहीएत. त्यामुळे त्यांना कामधंदा करता येत नाहीए. घरात रेशन आणि खाण्याचे पदार्थ संपले आहेत. सचिन एका किराणा दुकानात काम करत होता, तर त्याचे वडिल नेत्रपाल मजुराचं काम करत होते. सीमा आणि तिच्या चार मुलांना मिळून आता सचिनच्या कुटुंबात आता आठ जण आहेत. त्यांचं पोट भरणं कठिण होऊन बसलं आहे. सचिन आणि वडिल नेत्रपाल यांनी कामावर जाऊ देण्याची विनंती पोलिसांनी केली होती. 

हेही वाचा :  'माझा मुलगाच सचिनला संपवेल'; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी

सचिनला नोकरीचा प्रस्ताव
आर्थिक संकटाचा प्रश्न उद्भवल्याच्या बातमीनंतर सचिन आणि सीमाला नोकरीचे प्रस्ताव दिले जात आहेत. गुजरातच्या उद्योगपतीशिवाय अमित जानी नावाच्या एका चित्रपट दिग्दर्शकाने दोघांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. यावर सचिन आणि सीमाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान सीमाची उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसकडून चौकशी सुरु आहे. सचिन-सीमाबरोबर कुटुंबियांच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस नजर ठेऊन आहेत. सीमाने मात्र स्वत:ला भारतीय असल्याचं म्हणायला सुरुवात केली आहे. मेरा भारत महान म्हणत असल्याचा सीमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …