सन मराठी या नव्या वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रसारित केल्या जात आहेत. सध्या अनेक मराठी चायनल पाहायला मिळतात त्यामुळे प्रत्येक वाहिनी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्तम मालिका घेऊन येताना पाहायला मिळतात. धार्मिक तसेच पारिवारिक मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच आवडीच्या मालिका ठरताना पाहायला मिळतात ह्याचाच विचार करून सन मराठीने देखील उत्तम मालिका सादर केलेल्या पाहायला मिळतात. ‘संत गजानन शेगावीचे’ ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत संत गजानन महाराजांची मध्यवर्ती साकारली आहे अभिनेता अमित फाटक याने.

आतिष मोरे, मयूर खांडगे, प्रतिमा देशपांडे, संजीव तांडेल, अक्षय टाक , पूजा नायक , राजश्री निकम अशा बऱ्याच जाणत्या कलाकारांची साथ मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत प्रथमच एका बालकलाकार मुलीसोबत तिची आई देखील पाहायला मिळत आहे. अनेकांना हे माहित नसेल कि मालिकेत रील लाईफ माय लेकीची भूमिका निभावत असलेल्या सत्यभामा आणि नर्मदा या दोघी मायलेकी खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्यात माय लेकीचंच नातं आहे. मालिकेत सत्यभामाची भूमिका खाष्ट आणि कजाग सासुची आहे जी तिच्या सुनेला म्हणजेच जानकीला नाहक त्रास देणारी आहे. मात्र सत्यभामाची लेक नर्मदा ही तिच्या वाहिनीच्या बाजूने असलेली पाहायला मिळते. सत्यभामाची भूमीका विरोधी अभिनेत्री पूजा नायक यांनी आपल्या अभिनयाने चोख बजावली आहे. अभिनेत्री पूजा नायक यांची मुलगी राधा नायक ही देखील याच मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खऱ्या आयुष्यातल्या ह्या मायलेकी मालिकेतून त्याच भूमिकेत जगताना दिसत आहे.

अभिनेत्री पूजा नायक यांनी आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पिकूली, अथांग, छोटी मालकीण, बकाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, नऊ महिने नऊ दिवस, बिस्कीट, तू माझा सांगाती, एक हजाराची नोट, सावित्री जोती अशा मालिका आणि चित्रपटातून विरोधी तर कधी सहाय्यक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची दहा वर्षांची लेक राधा नायक हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. आई आणि मुलगी ह्यांची जोडी पाहायला देखील खूप सुंदर वाटते. पडद्यावर आणि पड्याबाहेर देखील माय लेकीची हि जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. मायलेकी मालिकेत देखील तश्याच दाखवण्याची हि कदाचित पहिलीच वेळ असावी. असो “संत गजानन शेगावीचे” या मालिकेनिमित्त बालकलाकार राधा नायक आणि आणि अभिनेत्री पूजा नायक यांना मनःपूर्वक शुभेच्छा …