सानिया मिर्झा बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर

Sania Mirza Success Story: उंच उड्डाण घेण्याची हिंमत बाळगत असाल तर लक्ष्य कितीही उंच आहे याने काही फरक पडत नाही. मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या स्वप्नांना पंख लावून उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक (भारताची पहिली मुस्लिम महिला पायलट) म्हणून निवड झालेली ती भारतीय हवाई दलातील पहिली मुस्लिम मुलगी आहे.

पहिली मुस्लिम लढाऊ वैमानिक

मिर्झापूर जिल्ह्यातील देहत कोतवाली भागातील जसोवर येथे राहणारी टीव्ही मेकॅनिक शाहिद अली यांची मुलगी सानिया मिर्झा हिने एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जसोवरच्या या मुलीने देशात नावलौकिक मिळवला आहे. सानिया मिर्झाने गावातील पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने गुरुनानक इंटर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेत जिल्ह्यात अव्वल ठरली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेंच्युरियन डिफेन्स अॅकॅडमीमधून तिने तयारी केली. सानिया मिर्झाच्या जॉईनिंग लेटरनंतर कुटुंबीय आनंदी आहेत. २७ डिसेंबरला सानियाला खडगवासला पुणे येथे जाऊन एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे.

हेही वाचा :  दहावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने अपहरणाचा बनाव

शिक्षणासाठी वडिलांची रात्रंदिवस मेहनत

मुलीला पैशांमुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सानिया मिर्झाचे वडील शाहिद अली यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ८ तासांऐवजी १२ ते १४ तास मेहनत घेतली. आज मुलीने असे काम केले आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे ते सांगतात. तर ‘मुलगी जेव्हा अभ्यासाला जायची तेव्हा रात्री खूप टेन्शन असायचे. आजूबाजूचे लोकही खूप काही सांगायचे, पण आज आम्हाला तिचा अभिमान असल्याचे सानियाची आई तबस्सुम मिर्झा यांनी सांगितले. आम्हालाही अभ्यास करायचा होता, पण अभ्यास करता आला नाही. आमच्या मुलीने गावाचे आणि जिल्ह्याचे नाव रोशन केल्याचे त्या कौतुकाने सांगतात.

Success Story: गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात दिली UPSC परीक्षा, IPS पूनम यांची कहाणी लाखो तरुणांना देईल प्रेरणा

Success Story: वडिलांनी वर्षभराच्या पगारातून अमेरिकेचं तिकीट काढून दिलं, आज मुलगा घेतोय करोडोंचा पगार

१९ जागा महिलांसाठी राखीव

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी २०२२ च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी ४०० जागा होत्या. ज्यामध्ये १९ जागा महिलांसाठी राखीव होत्या. फायटर पायलटसाठी दोन जागा राखीव होत्या. ज्यामध्ये सानिया मिर्झाने तिची जागा निश्चित केली आहे. यापूर्वी एकदा सानियाने परीक्षा दिली होती, जिथे ती पात्र ठरली नव्हती. दुसऱ्यांदा लेखी, मुलाखत, सीपीएस मेडिकल फिटनेस पात्रता मिळवून दोन जागांवर स्थान मिळवण्यात तिला यश आले.

हेही वाचा :  पोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story

मुलीच्या पालकांना सल्ला

सानिया म्हणाली की, आजच्या मुलींसाठी मी इथे सांगू इच्छिते की, ज्या पालकांना वाटते की भरपूर पैसे जमवल्यानंतर आपल्या मुलींची लग्ने होतात. ते पैसे मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खर्च करणे चांगले असे सानिया सांगते. मी परदेशात शिकतेय याबद्दल समाजात चर्चा व्हायची पण त्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण सोसायटी माझी फी भरत नाही. माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत, कुटुंबातील सदस्य माझ्यासोबत आहेत, हे खूप आहे, असेही ती सांगते.

Success Story: इंजिनीअरिंग करणारी सृष्टी देशमुख पहिल्याच प्रयत्नात बनली आयएएस अधिकारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …