Russia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट

Russia Ukraine War: रशियायाने (Russia) केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने (Ukraine) भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. भारतातले युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Igor Polikha) म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

रशियाने केवळ लष्करी तळांवर हल्ले होत असल्याचा दावा केला आहे. पण या हल्ल्यात युक्रेनमधल्या अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याचं इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे. रशियाची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याशिवाय टँक आणि ट्रक उद्ध्वस्त केल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. 

मोदी हे जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. पुतीन इतर किती नेत्यांचं ऐकतील हे मला माहीत नाही. पण मोदींसोबत त्यांचे सौदार्हयाचे संबंध आहेत. त्यामुळे मोदी यात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा आहे, असं  इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे. 

भारत हा UN सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आणि प्रभावी देश आहे. युक्रेन हा भारतासारखा लोकशाही देश असल्याचं राजदूत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  “आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास….”; पुतिन यांचा जगभरातील देशांना पुन्हा इशारा

रशिया युक्रेन वादावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्धाबाबत तटस्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे तसंच शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशाही व्यक्त करण्यात आली आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत भारताने युक्रेनमध्ये शिकणाऱ्या आणि नोकरीनिमित्ताने राहणाऱ्या 20 हजार भारतीयांच्या सुरक्षेची काळजी असल्याचं सांगितलं आहे.

युक्रेनमधल्या भारतीयांसाठी सूचना
युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमधल्या भारतीयांसाठी एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, असे सांगण्यात आलं आहे. लोकांना त्यांच्या घरी, वसतिगृहात राहण्यास सांगितलं आहे. जे लोक युक्रेनची राजधानी कीव किंवा वेस्टर्न कीव्हच्या दिशेने गेले आहेत, त्यांनी आपल्या घरी परतावे, असंही सांगण्यात आलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …